Saturday, 8 March 2025

५. डिंगूचा कट्टा - मामाच्या देशात जाऊया (कै. वि. मा. जोशी)

मामाच्या देशात जाऊया  

कै. वि. मा. जोशी


विमान झरझर जमीन सोडी 

आकाशी घेई अलगद उडी 
ढगांच्या वरतून उडूया
मामाच्या देशात जाऊया 

विसा पासपोर्ट जोखीम फार
तिकीट कसं हो सांभाळणार
लोढण गळ्यातच घालू या 
मजेत विमानाने जाऊया 

मामाच्या देशात जाऊया 

दुकान तिथली झोकात 
खेळही सुरू जोरात 
छान छान कपडे आणूया
ऐटीत खूप फिरूया 

मामाच्या देशात जाऊया

तळी इथली किती किती छान 
भोवती हिरवं हिरवं रान 
हरपून जाते आपलं भान 
तळ्याला चक्कर मारू या

मामाच्या देशात जाऊया

मामी मोठी उदार 
पिझ्याची देई ऑर्डर 
रोज रोज वेगळं बर्गर 
पेप्सी नि कोला पिऊ या 

मामाच्या देशात जाऊया

- कै. वि. मा. जोशी, लंडन 


1 comment:

  1. सुशील कडू16 May 2025 at 21:03

    मस्त,चित्रातले विमानही छानच आहे.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर