मला आई व्हावंसं वाटतं
नेहा बापट-अन्वेकर
https://youtu.be/C8bxam3qh90?si=VLl8BP5Zd4HJaC5K
या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं
मला आई व्हावंसं वाटतं
एखाद्या कुकुल्या तान्ह्या बाळावर भरभरून प्रेम करावंसं वाटतं
सर्व चिंता काळजी विसरून आपलं बालपण त्याच्या रूपात शोधावंसं वाटतं
मला आई व्हावंसं वाटतं
ती तरफड, तो त्रास, स्वत:ला सिद्ध करण्याचा तो प्रयत्न
आयुष्यात यश मिळवण्यासाठी कधी न संपणारा तो जत्न
कुठे तरी हे सर्व थोड थांबवावंसं वाटतं
परत एकदा twinkle-twinkle, humpty-dumpty, म्हणावंसं वाटतं
एखाद्या गोड गोजिऱ्याची आई व्हावंसं वाटतं
या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं
मला आई व्हावंसं वाटतं (१)
ती वेळेवारी ऑफिस पोचण्याची तडजोड, आणि त्यावर ट्रॅफिक जाम
जणु माझ्या आयुष्याच्या शब्दकोषातून हरवून गेला असो शब्द आराम
हिवाळ्याच्या उन्हात निवांतपणी लोकरीचे लहान-लहान मोजे विणावंसं वाटतं
परत एकदा काऊ-काऊ चिऊ-चिऊच्या गोष्टीत रमावंसं वाटतं
एखाद्या सोनुल्या किंवा सोनुलीच्या बोबड्या तोंडी आई ऐकावंसं वाटतं
या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं
मला आई व्हावंसं वाटतं (२)
त्या meetings, ते issues, रोज नवीन प्रकारचे ते error
Client चा pressure देतो नुस्ता मनस्ताप आणि terror
हा professional role अगदी विसरून जावंसं वाटतं
एका नवीन भूमिकेत शिरुन आयुष्याला वेगळं वळण द्यावंसं वाटतं
एका नवांकुराला आपल्या कुशीत घ्यावंसं वाटतं
या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं
मला आई व्हावंसं वाटतं (३)
भाग्यवान आहे मी, जिला सासर-माहेरी, प्रेम-जिव्हाळ्याची नाती लाभली
सतत असतेच माझ्यावर सौरभ यांच्या प्रेमाची सावली
तरी जगातील सर्वात मोठ्ठया सुखाशी जे वंछित आहे तेच अनुभवावंसं वाटतं
कवियित्री नाही तरी शब्दा माध्यमाने येवढच सांगावंसं वाटतं
की अता एक पाय नाचव रे मुरारी म्हणावंसं वाटतं
दुधाच भांड घेऊन कोणा मागे पळावंसं वाटतं
वरण-भाताचा घास कालवून कोणा तोंडी भरवावंसं वाटतं
एखाद्या नटखट कन्हैया ची यशोदा व्हावंसं वाटतं
या धावपळीच्या जगात चार क्षण सुखाचे जगावंसं वाटतं
मला आई व्हावंसं वाटतं (४)
मला आई व्हावंसं वाटतं..
-- नेहा बापट अन्वेकर, स्टॅफोर्ड, यु.के.
छान, लहान मुलांमध्ये आपण आपल्याला विसरुन जातो.
ReplyDeleteआपल्या भावना खूप सुंदर व्यक्त केल्या आहेत.
ReplyDeleteछान कविता ,आपले अनुभव छान लिहिले आहेत .
ReplyDeleteWow so beautifully expressed . You are echoing the voice of all working women. Indeed becoming mother is so special. It took me 35 years ago. Loved it. 😍
ReplyDelete