चालत जाणे
राहूल गडेकर
विशेष नाही चालत चालत जाणे
विशेष आहे सोबत चालत जाणे
कधीतरी फसले आणि कधी तरले
उलट दिशेने वाहत, चालत जाणे
वाट बदलते परंतु बदलत नाही
तिची आठवण काढत चालत जाणे
शेवटी तिला उलगडली चाल
नवी
गाठ मनाला मारत चालत जाणे
जर टिकायचे आहे काळासोबत
कात स्वतःची टाकत चालत जाणे
निरुत्तरित भटकंती होती नुसती
उगम नदीचा शोधत चालत जाणे
रात्र चांगली जावो वा ना जावो
दिवस आपला समजत चालत जाणे
एकट्यात माझा विरंगुळा असतो
एकच तारा पाहत चालत जाणे
कुठे धावणे मागे गर्दीच्या अन्
कुठे स्वतःला शोधत चालत जाणे
बघवत नव्हते दिवस तिचे शेवटचे
त्याच कहाण्या सांगत चालत जाणे
- राहूल गडेकर
वाहवा क्या बात है!
ReplyDeleteगझल आवडली
ReplyDeleteअप्रतिम गझल.
ReplyDelete