Saturday, 8 March 2025

३.३ कविता - संवाद परदेशातील मनाशी (जागृती जोशी )

संवाद - परदेशातील मनाशी  

 जागृती जोशी


 https://youtu.be/rQtCXNyF_vU?si=JN_XWWoc246DC7UR

एकदा मी मनाशी संवाद साधला......

रे मना, का तू आठवणीत गुंततोस,
चलचित्र भूतकाळातील डोळ्यांपुढे का उभारतो ||१||

का आठवतोस तो कट्टा, ते मित्र आणि त्या गप्पा, 
का सारखा सारखा आठवतोस तो आईच्या हातच्या जेवणाचा डब्बा ||२||

कोणास ठाऊक आता जागेवर असेल तरी का ती चहा-वडापाव ची टपरी,
मोडून तोडून Renovate झाली असेल ती सगळी नगरी ||३||

पारंपरिक सणांची खास मजा अशी आता उरलीये कुठे,
शनिवार रविवार जोडून येताच बनतो Holiday Plan पुढे ||४||

माणसा-माणसात आता DIGITAL Connect वाढलाय,
हातावर टाळी आणि पाठीवर थाप याचा जणू काळच उलटलाय||५|| 

"मित्रांना भेटून त्यांची प्रवासवर्णन ऐकावी " ही प्रथाच जणू मागे पडलीये,
मिनिटं-मिनिटाला status story ची update येऊ लागलीये ||६||

रे मना, बघ जरा परदेशात आपण राहतो,
ही अशी चकाकी आणि स्वप्नातली जादुई नगरी रोजच अनुभवतो ||७||

चल मग, रमून जाऊया आता आपल्या या नव्या जगात ,
सोडून दे आता त्या जुन्या आठवणींचा थरथरणारा हात ||८||

रे मना, चल दे तू आता मला पूर्ण साथ, 
मिळुनी सर करू आव्हाने आणि करू जगावर मात ||९||

यावर मन माझं म्हणतंय कसं......

खरंय तुझं, का उगाच अडकावं आणि उजळवाव्या जुन्या आठवणी,
तसं पहिला तर खरंच पुसट झालीये आता आजोबांनी सांगितलेली कहाणी ||१०||

चकाकीच्या या जगात चल हरवून जाऊया ,
परतून मागे न पाहता, रोज नवनवीन गोष्टी अनुभवुया||११||

पण एकदा मला सांग , खरंच जमेल का तुला हे,
धावता धावता कधीच विसावणार नाही अशी शपथच घे ||१२||

सांग बरं मग का शोधतो तू Indian Community चा group ,
सणवार , भजन कीर्तन यात कसा रमतोस तू खूप ||१३||

परदेशी राहून पण गप्पा सगळ्या देशी,
पुणे-मुंबई वर बोलतांना menu हवा खान्देशी ||१४||

सांग बरं, परदेशातल्या आपल्या इटुकल्या-पिटुकल्यांना का घालतोस संस्कार वर्गात,
रंगून जाऊदे कि त्यांना पण या बदलाच्या पर्वात ||१५||

अजूनही का लागते तुला मायदेशाची ओढ ,
रमून जा की या चकाकीत आणि परतण्याचा विचारच सोड ||१६||

मायदेशात निरोपाच्या वेळी येत न मन दाटून आणि होतात न अनावर अश्रू,
घट्ट मिठी मारून सांगतोस ना "आम्हाला नका विसरू" ||१७||

कितीही धावलास या जादुई नगरीत तरी माघारी तू फिरशील,
बाबांच्या मिठीत आणि आईच्या कुशीतच तू विसावशील||१८||

लक्षात ठेव, युगे बदलली अनेक आणि लोटला मोठा काळ, 
पण एकाच सांगतो, अशी कधीच तुटत नाही हि अदृश्य नाळ ||१९||

जागृती जोशी 
Altrincham UK

5 comments:

  1. जागृती, कविता छानच केली आहेस. आपल्या सर्व "भारतीयांच्या" मनोभावना तू यथार्थ शब्दांत व्यक्त केल्या आहेस. अशाच आणखीन कविता, लेख आम्हाला वाचायला मिळतील अशी आशा करते. त्यासाठी खुप खुप सदिच्छा. 👌👏

    ReplyDelete
  2. छान कविता जागृती . आपल्या भाषेची , संस्कृतीची आणि मातृभूमि साठी तू छान विचार मांडले आहेत . असे व्यक्त होताना एक वेगळाच आनंद मिळतो .

    ReplyDelete
  3. जागृती कविता खूपच छान केली आहेस. रसाळ कुटुंबियांची सुन शोभतेस. तुझ्यातील कलागुण अशेच बहरत राहो. खुव खुप शुभेच्छा 💐💐

    ReplyDelete
  4. सुंदर आणि अचूक शब्दात आपल्या सर्वांच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

    ReplyDelete
  5. khup sundar kavita kelie

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर