मनी या कसे ही नवे गीत येते
श्रीकांत पट्टलवार
कळेना असे हे मला काय होते
मनी या कसे ही नवे गीत येते
कुणी गीत गाई कुणाच्या मनीचे
कुणी आळवी रोज सूर रागिणींचे
कुणी आळवी रोज सूर रागिणींचे
सूर-शब्द माळेतून गुंफून येते
मनी या असे हे नवे गीत येते
मनी या असे हे नवे गीत येते
कधी भेटती मित्र उमलत्या दिसांचे
सजू लागती सोहळे त्या क्षणांचे
सजू लागती सोहळे त्या क्षणांचे
क्षणातून स्वप्नांच्या हळूच ते उमलते
मनी या असे ही नवे गीत येते
मनी या असे ही नवे गीत येते
कुणी गाव सोडी कुणा खंत वाटे
कुणी धाव घेता कुणा धन्य वाटे
कुणी धाव घेता कुणा धन्य वाटे
तया पाहताना मला ते उमगते
मनी या असे हे नवे गीत येते
मनी या असे हे नवे गीत येते
कधी गात फिरतो मी गीत जीवनाचे
कधी ऐकतो ते झऱ्यांचे, घनांचे
कधी ऐकतो ते झऱ्यांचे, घनांचे
धरा ही जशी या वसंतात फुलते
मनी या असे हे नवे गीत येते
मनी या असे हे नवे गीत येते
- श्रीकांत पट्टलवार
छान कविता! आता गाऊन दाखव! 😊
ReplyDeleteपूर्णपणे सहमत आहे. "गीत" ऑडिओ केला असता तर आणखीनच छान वाटले असते. लिना फाटक
Deleteकविता/गीत छान आहे. अगदी सकारात्मक. आम्हांला तुमच्या आवाजात ऐकायला मिळाली त्यामुळे तोही आनंद मिळाला.
ReplyDelete