Thursday, 26 June 2025

६. गंमत जंमत - एक वेगळाच सांख्यिकी योगायोग (संजय भगवंत कुळकर्णी)

गंमत जंमतएक वेगळाच सांख्यिकी योगायोग

संजय भगवंत कुळकर्णी


कधीकधी आपल्या वाचनात आकड्यांचे सांख्यिकी योगायोग आपल्याला लक्षात येतात व आपण अचंबित होतो. लगेचच ते दुसऱ्याला सांगावेसे वाटतात. हा बघा एक वैश्विक संदर्भातील वैज्ञानिक परिभाषेतील योगायोग :


आपल्याला प्रकाशाचा वेग 299.792458 मी./से.असा आहे, हे ठाऊक आहे. पण हेच 9 आकडे विभिन्न ठिकाणी अचानक दिसले तर, अहो होय. बघा कसे ते :

गिझा (Giza) येथील Pyramid ह्या प्रसिद्ध रचनेचे अक्षांश (Latitude) 29.9792458 deg N, असे आहेत.


हा कित्ती वेगळाच योगायोग आहे ना! प्रकाशाचा वेग (Speed of light ) कुठे, आणि latitude कुठे. ह्यांची मापेही वेगळी आहेत.

पण आपल्याला या भूतलावरील मानवाला माहित असलेल्या, जीवनाशी निगडित वैज्ञानिक, भौगोलिक अशा संकल्पना आहेत हे मान्य करावेच लागेल. हो ना? फार वर्षांपूर्वी प्रकाशाचा वेग माहिती नव्हता. पण ह्या आणि इतर सगळ्याच गोष्टींकडे आपण डिजिटल पाहायला लागलोय. हे सृष्टीकर्त्याचे डिजिटल स्वरूप अनेक संकल्पना समजण्यात, त्यांचा संबंध लावण्यात मानवी बुद्धी कार्यरत असतें हे मात्र खरे.

संजय भगवंत कुळकर्णी,
निवृत्त गणित प्राध्यापक,
मिल्टन कीन्स.  

3 comments:

  1. Excellent information

    ReplyDelete
  2. वाचून आश्चर्य वाटतं
    मनोरंजक माहिती

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर