जगणे
उल्का चौधरी
जगणे कसे हे जगणे
घडीत हसणे घडीत रडणे
मनाच्या आश्वासनावर हुरळून फसणे
जगणे कसे हे जगणे?
अगणित रंगवून स्वप्ने
त्या स्वप्नांमध्येच रंगणे!
न मोडो स्वप्न कधी हे
का मनी भीती ही बाळगणे!
जगणे कसे हे जगणे?
हुरहूर, का ती मनास?
नाही स्वच्छंद जगण्याची आस!
चोरून हसणे, हसून रडणे,
का राहे मन उदास घाबरे जगण्यास?
होईल काय पुढच्या घटके!
काळजी ही कंठी अटके
जगणे कसे हे जगणे?
जाणून घे, तू जीवनाचे सत्य
ह्या स्थानाचे महत्व,
जगण्याचे खरे सत्व!
क्षण हा तोलाचा
लाख मोलाचा!
जगून घे ह्या क्षणात,
नको राहूस उद्याच्या भ्रमात
जगणे असेच हे जगणे!!
जगणे असेच हे जगणे
कधी रडणे, कधी हसणे
जगणे असेच हे जगणे
- उल्का संके चौधरी.
क्षण हा तोलाचा आणि तो जगणे हेच सत्य , वा वा छान
ReplyDelete