ध्यास
लीना फाटक
गायकाच्या मनी चाले
गुंजारव तो स्वरांचा
लेखकाच्या मनी असे
मुक्त विहार शब्दांचा ।।१।।
चित्रकार मनी रेखी
सप्त-रंगी इंद्रधनू
शिल्पकार मनी पाही
सजीवच मूर्ती जणू ।।२।।
नृत्यांगना मनी ऐकी
पदन्यास घुंगराचे
शास्त्रज्ञ मनात शोधी
"गूढ अर्थ" या विश्वाचे ।।३।।
शेतकऱ्याच्या मनात
चिंता असे पर्जन्याची
कष्टकऱ्याच्या मनात
चिंता साध्या भाकरीची ।।४।।
माझ्या मनी मात्र असो,
नाद ओम्-काराचा,
माझ्या मनी नित्य वसो
ध्यास प्रभू चरणांचा ।।५।।
लीना फाटक, वॉरिंग्टन, चेशायर.
खूप छान
ReplyDeleteSurekh Kavita Tai 🌷🌷
DeleteSurekh Kavita tai 🌷
ReplyDeleteआयुष्याचे गमक व कवितेतील यमक ह्याचा सुरेख वेध घेतलाय ह्या कवितेत. यथार्थ सार, पण लक्षात यायला व त्यानुसार आचरण व्हायला फार फार उशीर होतो. राम कृष्ण हरी विठ्ठल. 🌹🙏
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteसुंदर कविता लीनाताई !
ReplyDelete