साहित्य
करुणा नेहरकर
ना मी कवयित्री ना लेखिका
ना मी अभ्यासला साहित्याचा पाठ
लिखाण माझं म्हणजे केवळ
विचारांना मोकळी करून दिलेली वाट
लिहिताना करते शब्दांची पेरण
नाही कळत मला त्यातील व्याकरण
करीत असते शब्दांची फक्त उधळण
रितं करीत असते कल्पनांनी भरलेलं मन
जेव्हा माझ्या लेख अन कविता
घेतात एक परिपूर्ण आकार
तरीसुद्धा नाही जराही कळत
कोणता लिहिला मी साहित्यप्रकार
कविता करताना जरी नकळत
शब्द लागतात यमक जुळू
कसब लिखणाचे लागते जेव्हा
नसतो द्यायचा मार्मिक अर्थ टळू
अमाप पीक आलं कवींचं
म्हणाल यमक जुळवणारे पाहून
काय सांगू? हेच लिखाण जातं
एक वेगळंच समाधान देऊन
लिहिते मी लेख नि कविता
छंद माझा जपायला
अनुभव येतात नित्य नवे
जग नजरेने कवीच्या पहायला
प्रामाणिक कौतुकाची थाप
जेव्हा वाचकांकडून मिळते
तेव्हा नवी साहित्यकृती बनविण्याची
प्रेरणा आपोआपच त्यातून मिळते
करतात प्रयत्न लिहिण्याचा
नवोदित कवी आणि लेखक
करा समीक्षण साहित्याचे
आणि करा कौतुक माफक
तुमच्या प्रतिक्रियेचे भांडवल
देईल लिहिण्यात सकारात्मक ऊर्जा
कालांतराने होईल तरबेज
आणि सुधारेल लिखाणाचा दर्जा
- करुणा नेहरकर
खुप सुंदर....
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteनितांत सुंदर 💖
ReplyDeleteआपल्या लेखनाचा दर्जा नैसर्गिक असल्यामुळे तो खूप वरचा आहे. कवितेतील मर्म लगेचच कळतं. त्याकरता वेगळं विवेचन कराव लागत नाही.
ReplyDeleteएक निसर्ग रम्य कविता, असाच नितांत प्रेम भाव, नेहेमीच रहावा. हिरवी हिरवी पाने सोबत असता, झुंबर पिवळा हळूच हालता, एक सात्विक आशीर्वादच मग, मन माझे प्रसन्न करतो बहावा, मन माझे प्रसन्न करतो बहावा.
ReplyDeleteप्रत्येक कडवं एक छान संदेश देतो ! सुंदर कविता
ReplyDeleteअसेच कविता करत रहा