तारा
अंजली शेगुणशी
छेडिल्या तारा स्मृतींच्या
रिक्त एकांतात या
तेविल्या ज्योती कुणीशा
गर्द अंधारात या
सोडुनी जे गेले मजला
शोधु कुठे मी त्या सुरांना
पाहु मी आता कुणाला
राहिल्या स्वप्नात या
विरून गेली साद आता
राहिले पडसाद मागे
फिरून बघतो मी तरीही
सावल्या मागे तुझ्या
- अंजली शेगुणशी
छान कविता
ReplyDeleteसलील यांनी काढलेले फोटो अप्रतिम सुंदर आहेत. असे फोटो काढायला चिकाटी व तशी दृष्टी पाहिजे. मीरा तुझे लिखाण या फोटोंना साजेसे आहे.
ReplyDelete