लुच्ची जीभ
नेहा बापट अन्वेकर
लहानपणापासूनच मला ताटाची डावी बाजु म्हणजेच चटणी, मिरची, कोशिंबीर,
लोणची आवडत असत! हे बघताच तोंडाला पाणी सुटायचे. अर्थातच मी लेफ्टिस्ट आहे अशी समजुत करून घेऊ नका. उजवीकडे वाढलेले पदार्थही - फळ भाजी, मेथीची पातळ भाजी (झणझणीत लसणीची फोडणी असलेली) - ही तितकेच प्रिय. तर लेफ्ट असो किंवा राइट विंग, कुठली ही, शेवटी सर्व काही सेंटरच्या भातात कालवून घ्यावं लागत तेव्हा जो घास घेतल्याचं समाधान आणि कालवलेल्या घासाची स्वादपूर्ती होते त्याला तोडच नाही!मुळातच मी फार चटोरी. हो चटोरी, हाच शब्द योग्य ठरेल! तर चटोरीच आहे, हे म्हणायला हरकत नाही; पण त्याचा दोष मी माझ्यावर न
घेता माझ्या आजी-आई-काकूंना देईन. आमचे पारंपरिक महाराष्ट्रीयन संयुक्त कुटुंब
असल्या मुळे, सतत घरात सण-वार, त्यात
केले जाणारे वेगवेगळे पदार्थ आणि त्या विषयाची चर्चा, आणि
कुठल्या सणाला काय गोड करायचे, हे लहानपणापासूनच
माझ्या कानावर पडत होते. अगदी साधी शिजवलेली कोरडी बटाट्याची भाजी कशी असावी,
त्यावरही मी उपदेश करू शकते. अर्थात बटाट्याच्या फोडी एकसारख्या
चिरण्यापासून, त्यात हळदीचे प्रमाण किती - खूपच
जास्त्त हळद पडल्यास भाजी पिवळी धम्म झाली आता ती पानावर शोभून दिसणार नाही,
असे म्हणायचे. हे म्हणजे वेडिंग रीसेप्शनला उभी राहणाऱ्या एका नवीन
नवरीचे make up बिघडले आणि आता ती नवऱ्या मुलाला शोभून
दिसणार नाही, इतके सिरियस. हळद आणि तिखट, यांचे प्रमाण, नुसते स्वादावर न अवलंबून -
रूपावर आणि रंगावर ही असावे - त्या दोन्ही रंगाचा कॉम्बिनेशन,
त्यामुळे सुरेख तयार झालेला हल्का नारंगी रंग येईल अशीच भाजी पानाला
शोभून दिसते. तसेच मेथीच्या पातळ भाजी साठी मेथी निवडत असताना, थोडासा भाग दांडी चा ही घ्यावा, असं न केल्यास,
किंवा नुसती पानंच घेतल्यास भाजी शेणा सारखी होईल, अश्या असंख्य सूचना। एखादा नवीन शेफ ऐकून, पळूनच
जाईल!
आता शेणासारखी का मेणासारखी, गमतीचा भाग असा
की पोटात गेल्यावर सर्व काही शेणच होते नं! पण पदार्थाला चवी सोबत, गुण आणि रूप ही तितकेच महत्वाचे अशी आमच्या घरी पक्की समजूत होती.
थोडक्यात म्हणजे डोळ्यांना सुरेख दिसणारे पान आणि दृष्टीस पडल्या मुळे तोंडाला
सुटणारे पाणी - पचनक्रिया मूळात डोळ्यांपासून सुरू होते, मग
जिभेहून पुढे वाढते, मग पोटात जाते आणि शेवटी त्याचे **
होते. जेव्हा पोटात जाऊन शेवटी सर्वांचे ** होणार, तेव्हा
एकीकडे काहीही खावे, कसेही खावे, कित्तीही
खावे अशी बेफिक्रीची आणि दुसरीकडे जितके भाग्यात मिळेल, जसे
मिळेल, तितके खावे आणि प्रसन्न राहावे अशी संत प्रवृत्तीची,
या दोन्हीही विचारधारा मला कधीच पटलेल्या नाहीत. मला तर स्वप्नातही
पाणीपुरी, सामोसे, छोले-भटुरे, झणझणीत मिसळ पाव, भरली वांगी, मिरचीचा
ठेचा दिसत असे.
नेहमी ताजे-सुग्रास-चमचमीत अन्न शिजवावे, स्वतः खावे आणि इतरांस ही प्रेमानी खाऊ घालावे, हीच माझी फिलॉसॉफी आणि याचा मला कधीही कंटाळा येत नाही. कारण ज्याला
झोपेतही उद्या स्वयंपाकात काय करायचे अशे विचार येत असतात, त्याला
कधी ही स्वस्थ बसू देत नाही त्याची "लुच्ची जीभ"!
-- नेहा बापट अन्वेकर
Wa Neha wa !! Confessions of a true Foodie 😃
ReplyDeleteDhanyawaad :-)
DeleteWaah waah,Surekh lekh 👌🏻
ReplyDelete" स्वतः खावे आणि इतरांना खिलवावे " आपली ही मनिषा नक्कीच वाखाणण्यासारखी आहे. या उपक्रमात आम्ही कसे आणि केंव्हा सहभागी व्हावे हे कृपया कळवावे.
ReplyDeleteसुंदर लेख. आणि सोबतची फूड फोटोग्राफी तर अप्रतिम.
छान लिहिलय.
ReplyDeleteसुंदर लेख
ReplyDeleteBeautiful photo. Food looks delicious. Enjoyed reading your article Neha.
ReplyDeleteThank you
Deleteखूप छान लिखाण!!
ReplyDeleteचवीने खाणारे खूप असतात पण आजकाल स्वतः करून खाऊ घालणारे फार कमी असतात..
आता जेवायला केव्हा बोलवता
ReplyDeleteआहे ?
Good article!! Enjoyed.
Leftist (plitical)should have written as "डावखोरी
आता जेवायला केव्हा बोलवता
ReplyDeleteआहे ?
Good article!! Enjoyed.
Leftist (plitical)should have written as "डावखोरी"
सुनिल सप्रे
Thanks for the feedback :-)
Deleteआता जेवायला केव्हा बोलवता
ReplyDeleteआहे ? तोंडाला पाणी सुटले.
छान कविता नेहा ! वाचून तुझ्या हातचे पदार्थ खायची इच्छा होते
ReplyDelete