Thursday, 26 June 2025

३.२ - कविता - बहावा (करुणा नेहरकर)

बहावा

करुणा नेहरकर

आज माझ्या अंगणी
फुलाला हा बहावा
किती करू कौतुक
किती करू वाहवा 

लपली पर्णे सारी
आणि फांदयाही लपल्या
पिवळ्या गडद फुलांच्या
लटा सर्वत्रच आल्या

रंग पिवळा कसा गं
दिसतो हा शोभून
झाड उभं दिमाखात
जणू सोनं गं लेवून

शृंगार हा निसर्गाचा
मनी किती साठवावा
देतो चाहूल पावसाची
हा फुललेला बहावा

- करुणा नेहरकर

6 comments:

  1. खुप सुंदर 💚

    ReplyDelete
  2. वाहवा बहावा. आपल्या कवितेतून बहावा आमच्या डोळ्यासमोर उभा राहिला. अशाच लिहीत रहा.

    ReplyDelete
  3. एक निसर्ग रम्य सुंदर कविता, असं म्हणतात कि बहावा फुलला कि लवकरच पावसाळा सुरु होईल. किंबहुना तसेच दरवर्षी घडते..हिरवी हिरवी पाने, गर्द पिवळे झुंबर, हळुवार झुळूक येता,डुलू लागते सुंदर अंबर.

    ReplyDelete
  4. चित्र डोळ्यापुढे उभं राहिलं , सुंदर

    ReplyDelete
  5. पिवळ्या गर्द फुलांच्या लटा हे वर्णन अगदी चपखल ! खरा बहावा डोळ्यापुढे उभा राहतो

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर