Thursday, 26 June 2025

३.६ - कविता - एकदा आईची आई होता यावे (पल्लवी पुरवंत)

एकदा आईची आई होता यावे 

पल्लवी  पुरवंत

एकदा आईची आई होता यावे
मिठीत तिला माझ्या घेऊन
तिचे आयुष्य पहाता यावे
तिच्या मनात साठवून ठेवलेल्या
असंख्य क्षणांची चावी व्हावे

झरझर झरझर क्षण सरताना
हात तिचा हाती घेऊन
क्षणात त्या पुन्हा उतरावे

आनंदाची आठवण आजही आहे ठळक
पण दुःखात ती कशी होती?
पचवून विषाचे प्याले सारे
हसत सुखात ती कशी होती?

एकदा आईची आई होता यावे
मिठीत तिला माझ्या घेऊन
तिचे आयुष्य पहाता यावे 

कंटाळवाण्या रोजच्या कामात
ती वारंवार रमत होती की
मोठ्या होणाऱ्या माझ्यात तिची
स्वप्नं नव्याने जगत होती

सडा रांगोळी नीटनेटकं घर
मुलं बाळं येणारा जाणारा
सारं सारं काही जपत होती
आई माझी कधी थकत होती?

एकदा आईची आई होता यावे
मिठीत तिला माझ्या घेऊन
तिचे आयुष्य पहाता यावे

हलकेच मारावी फुंकर तिच्या जखमांवर
आई ‘मी आहे ना’ हे औषध असावे
तिच्या एकटेपणावर
मुलगी, बहीण, सून, मावशी,
आत्या,मामी,काकू

ती सारं सारं काही असेलही
पण या साऱ्यांत माझं नशीब
अव्वल ठरावं
तिनं माझी आई व्हावं 

एकदा आईची आई होता यावे
मिठीत तिला माझ्या घेऊन
तिचे आयुष्य यावे.

पल्लवी पुरवंत. 

7 comments:

  1. खूप सुंदर, आई गेल्यावर अजून जाणवतं

    ReplyDelete
  2. सुंदर कविता पल्लवी , वाचतांना हेलावून जातो

    ReplyDelete
  3. It is so touching !

    ReplyDelete
  4. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  5. चारू कुळकर्णी: आईची वेगवेगळी रूपं क्षणात डोळ्यासमोर आलीत.हृदयस्पर्शी सुंदर कविता 👌👌

    ReplyDelete
  6. खुप सुंदर

    ReplyDelete
  7. Hi Pallu Di, nice poem

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर