Thursday, 26 June 2025

३.८ कविता - रती (अनिरुद्ध कापरेकर)

रती

अनिरुद्ध कापरेकर 


https://www.facebook.com/share/v/1JBizxSqyh/

हजारो-लाखो शब्द,
कवितेच्या लाघवी हातांनी,
कितीजणींवर, कितीवेळा,
खुलवले, उधळले, 
लुटवले.

काही शब्द, सहज गवसलेले,
काही खास शोधुन आणलेले,
काही उथळ पाण्यावर वाहत आलेले,
काही सागरतळाशी गच्च रुतलेले,
हजारो-लाखो शब्द.

तरीही,

एका क्षणाच्या 
चोरट्या नजरभेटेत,
हलकेच चाहुल लागणाऱ्या
प्रेमाकर्षणाला अभिव्यक्त करणारे
नेमके शब्द, मला सापडत नाहीत.

अजूनही,

इतकी वर्षे झाली,
तरीही.

आता वाटतं,
ते शब्द सापडुच नये मला.
अन् मीही ते शोधु नयेत.

त्या एका क्षणात,
त्या एका नजरेत,
त्या एका स्पंदनात,
जी रती
मला अकस्मात
रंगवून जाते,

ती कागद-शाईच्या,
काळ्या-पांढऱ्या
बिछान्यावर
काय भेटणार?

- अनिरुद्ध कापरेकर

5 comments:

  1. Beautiful poem

    ReplyDelete
  2. Very nice 👍

    ReplyDelete
  3. ह्या कवितेतून च तर ते व्यक्त होत आहेत ?

    ReplyDelete
  4. Kaka Karmarkar15 July 2025 at 18:11

    हृदय स्पर्शी कथन, तेही पश्र्चिमाईकडून! रसिकतेची दाद दिली पाहिजे! अभिनंदन!🙏🙏🙏

    ReplyDelete
  5. खूप छान, Audio मुळे कविता हृदयाला भिडते.

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर