फॅब्रिक कोलाजमधून सामाजिक योगदान
फॅब्रिक कोलाज आर्टिस्ट डॉ. अरुणा मेने (BEM) यांच्याशी गप्पा - मीरा पट्टलवार
माझं फॅब्रिक कोलाज आणि हस्तकला ह्या
माध्यमातून मी जगण्याचा आनंद मिळवते आणि
आयुष्य साजरे करते.
Minimizing waste, Recycling,
Sustainability हे परवलीचे शब्द आजकाल आपल्या कानावर सतत पडत असतात.
पण शिवणकामातून उरलेल्या चिंध्या, कापडाचे तुकडे किंवा वाया जाणारे जुने कपडे अशा सामान्यतः टाकावू वस्तूंचा
उपयोग करून त्यातून सुंदर कलाकृती निर्माण करणे हे फक्त डॉ.
अरुणा मेने यांच्यासारख्या सर्जनशील व्यक्तीच करु शकतात.
दैनंदिन विरंगुळा म्हणून
सुरू केलेला फॅब्रिक कोलाजचा छंद आणि त्यातून स्वतःच विकसित केलेल्या कलेच्या साहाय्यानं डॉ अरुणाने
इतकी भरारी घेतली की किंग चार्ल्सनी त्यांची कला आणि त्यातून घडलेल्या समाज-कार्याला दाद देत तिला BEM (Medal
of British Empire) हा बहुमान देऊन सन्मानित केलं! 'पश्चिमाई' दिवाळी अंकानिमित्त डॉ अरुणा मेने ह्यांच्याशी केलेल्या ह्या
गप्पा.
नॉर्थ वेस्ट मधील
सेमल्सबरी इथे मी अरुणाच पहिलं प्रदर्शन पाहिलं. निसर्गाच्या विविध छटा, सुंदर बागा, मोहक वृक्षांची वाट असे विविध फॅब्रिक कोलाज भिंतीवर लावले
होते. ते बघून 'प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट असं वाटत होतं. ह्या कलाकृती पाहिल्यावर आपण कुठेतरी पाहिलेली फुलं, बगीचा किंवा ठिकाण यांची आठवण होते आणि मग लगेच लक्षात येतं
की या कोलाज मध्ये एक वेगळंच कौशल्य दडलेलं आहे. चित्रकला, पेंटिंग आणि शिवणकाम असे तीन कौशल्य एकत्र
आणून अरूणानी फॅब्रिक कोलाजची नवीनच कला विकसित केली आहे.
अरुणा म्हणते लहानपणापासूनच मला चित्रकला, पेंटिंग ची आवड! माझी आई नेहमीच कापडांच्या सानिध्यात असायची आणि वेगवेगळ्या प्रकारचे कलात्मक शिवण करायची. तिचं पाहून, बाहुला बाहुलीच्या कपड्यांपासून सुरु करुन, मी पण शिवणकाम शिकले. मला फॅब्रिक कोलाज करण्याची प्रेरणा मिळाली ती माझ्या आईपासून!
पुढे हिस्टोपॅथॉलॉजिस्ट कन्सल्टंट झाल्यावरही रोजच्या रुटीन मधून रिलॅक्स होण्यासाठी अरुणाने एक विरंगुळा म्हणून आपला फॅब्रिक कोलाज हा छंद सुरुच ठेवला.
जगभर प्रवास करतांना बरीचशी पेंटिंग तिच्या मनात घर करुन गेली. जग प्रसिद्ध चित्रकार Gustav Klimt यांचं The Kiss किंवा J. Vermeer यांचं The Girl with a pearl earring यांची पेंटींग्ज पाहून तिला ह्याचं फॅब्रिक कोलाज करावं अशी कल्पना सुचली. अरुणा म्हणाली की एखादं निसर्गचित्रं किंवा मला आवडणारं पेन्टिंग पाहिल्यावर माझ्या मनात त्याची एक प्रतिमा तयार होते. त्याच कोलाज बनवताना नवनवीन गोष्टी सुचू लागतात. कापडी तुकड्यांच्या थरांमुळे साधलेला ३D इफेक्ट कोलाजमध्ये एक जिवंतपणा आणतो.
Abstract कलाकृती म्हणजे
कलाकाराच्या कल्पनेची झेप असते. उदाहरणार्थ Because I am a Woman यात स्त्रीला कोलाज च्या मध्यभागी दाखवणे किती योग्य ठरते.
हिस्टोपॅथोलॉजिस्ट म्हणून काम करतांना अरुणा मायक्रोस्कोप मधून वेगवेगळ्या टिशूंच्या स्लाईडस बघायची. त्यात दिसणाऱ्या पॅटर्न्स मध्येही तिला सौंदर्य दिसले आणि त्यातूनच Beauty under the Microscope या नावाने तिने बऱ्याच कोलाज ची निर्मिती केली. सांगायला आनंद होतो की अशा कोलाज ची दखल 'बुलेटिन ऑफ द रॉयल कोलाज ऑफ पॅथॉलॉजिस्ट्स' च्या समितीने घेतली आणि आणि ह्या जर्नलचे मुखपृष्ठ कोलाज प्रतिमेने सुशोभित झाले ज्यामध्ये अरुणा बद्दल लिहिलेले आर्टिकल होते. तसेच ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये या मालिकेबद्दल एक लेख सुद्धा होता.
लंडनमधील टूटिंग येथील
सेंट जॉर्जेस हॉस्पिटलमध्ये सन्माननीय स्थान असलेल्या कार्डियाक पॅथॉलॉजीच्या
प्राध्यापक डॉ. मेरी शेपर्ड यांनी कार्डियाक पॅथॉलॉजीवर फॅब्रिक कोलाज तयार
करण्याचे काम अरुणाला सोपवले होते.
कोलाज-कला फक्त वॉल आर्ट म्हणून मर्यादित न ठेवता अरुणा
टोपल्या, कोस्टर्स, बुक मार्क्स कुशन कव्हर्स, डोअर मॅट अशा विविध वस्तू पण करते. इतकंच काय पण ती
जुन्या पारंपरिक साड्या, ओढण्या, शाली यांचा वापर करुन fusion
wearable art (पूर्व पाश्चिमात्य मिश्रण) आणि फॅब्रिक
नेकलेस सारखे दागिने पण बनवते.
आजपर्यंत इंग्लंड (नॉर्थ वेस्ट /साऊथ ईस्ट) मध्ये अरुणाने १२० व्याख्यानं (टॉक्स) दिले आहेत आणि असंख्य प्रदर्शनं भरवली आहेत. तिच्या या उपक्रमांना नेहमीच उत्तम प्रतिसाद मिळतो.
बोल्टन मधल्या सामाजिकदृष्ट्या वंचित भागातील शाळेतील मुलांना फॅब्रिक कोलाज करण्याचे शिकवले आणि त्यांनी Rivington Woods हे कोलाज तयार केले.अरुणा म्हणते एक छंद म्हणून मी फॅब्रिक कोलाजची सुरुवात केली, पण पुढे प्रदर्शनातून निधी उभा करून तो १००% चॅरिटीजला द्यायचा असं ठरवलं. आनंदवन, हेमलकसा (लोक बिरादरी प्रकल्प ) जागृती ट्रस्ट, निर्माल्य ट्रस्ट, स्नेहवन ट्रस्ट पुणे, तसंच यु के मधील हॉस्पिसेस, निओनेटल ट्रस्ट इत्यादी या संस्थांना अरुणा मदत करते.
काही वर्षांपूर्वीची
गोष्ट. आनंदवनच्या स्व. डॉ शीतल आमटे अरुणाच्या कोलाज ने खूप प्रभावीत झाल्या.
त्या स्वतः ही उत्तम आर्टिस्ट आणि हरहुन्नरी होत्या. त्यांनी कुष्ठ रोग्यांना
फॅब्रिक कोलाज ची आयडिया सांगितली आणि काहींनी त्यातून सुंदर कलाकृती निर्माण
केल्या, त्याही शिवणकामातून उरलेल्या कापडाचा
/चिंध्यांचा वापर करुन!
अरुणाच्या ह्या यशाच्या
वाटचालीत अरुणाचे पति डॉ रवी मेने ह्यांचा मोठा हातभार आहे, फॅब्रिक कोलाज साठी छायाचित्रण आणि त्याकरिता लागणारे
तांत्रिक कौशल्य आणि समर्थन ही महत्वाची बाजू डॉ रवी सांभाळतात .
एका जपानी कंपनीने आपल्या
वार्षिक कॅलेंडर साठी अरुणाच्या फॅब्रिक कोलाज च्या प्रतिमा वापरल्या ,ज्याचं नाव होतं Joy of living त्याचप्रमाणे कॅनडा इथून प्रकाशित झालेल्या वार्षिक कॅलेंडर
मध्ये सुद्धा अरुणाच्या फॅब्रिक कोलाज च्या प्रतिमा वापरल्या .
आत्तापर्यंत अरुणाला
कलाक्षेत्रात दिले जाणारे अनेक पुरस्कार मिळालेत, फायनलिस्ट आणि रनर अप ACTA award London,
Indian Influencer in Manchester, Highly
commended 'Inspire women 2019' in Art,'100 Inspirational Women 2019' मध्ये अरुणाचा समावेश आहे.
ह्या सगळ्या पुरस्कारात एक अतिशय मानाचा गौरव म्हणजे अरुणाला १७ जून २३ रोजी किंग चार्ल्सच्या पहिल्या वाढदिवसाच्या सन्मान यादीत ब्रिटिश एम्पायर मेडल (BEM) हा पुरस्कार मिळाला. स्थानिक पातळीवर नावीन्यपूर्ण प्रत्यक्ष केलेले सेवाभावी कार्याकरता हा पुरस्कार दिला जातो. अरुणाला हा मानाचा पुरस्कार तर मिळालाचपण त्याच बरोबर फॅब्रिक कोलाजला चित्रकला, पेंटींग, शिल्पकला ह्यांच्याप्रमाणे एक स्वतंत्र कला म्हणून मान्यता मिळाली. डॉ. अरुणा आणि डॉ. रवी दोघांनाही फॅब्रिक कोलाज च्या पुढील उपक्रमांकरिता पश्चिमाई तर्फे शुभेच्छा.
High regards to Dr. Aruna and many thanks to Dr. Meera for giving the detail information in her interview. 🌹🙏
ReplyDeleteThank you very much Sanjay Kulkarni.
DeleteI am overwhelm Aruna. I always observed ur creation in tits n bits so I failed to appreciate fully
ReplyDeleteThe infinity of ur hobby and zeal for social cause . I have still preserved the calender u had sent to me. Jayashree shows to every body.and jokingly
Says Vinod can also have friends of grt quality.
We both wish u to achieve THE best of ur dreams. 👏👏👏🌹🫡🫡.
Thank you so much Vinod and Jayashree! You are very kind. Thank you so much for taking the time to read it .
Deleteमीरा ताई, लेख.खूपचं छान.
ReplyDeleteअरुणा, तुझ्या व्यक्तिमत्त्वाच्या एका वेगळ्या पैलूची खूप छान ओळख झाली. दोघींचेही अभिनंदन.
Thank you Rajshree. I liked your story too!
ReplyDeleteExcellent art work Aruna. Nice interview by Meera.
ReplyDeleteThank you Meena .
Deleteअप्रतिमलिखाण. टाकाऊ ते टिकाऊ ही संकल्पना खूप आवडली.अप्रतिम कोलाज. आता एकदा भारतात प्रदर्शन भरवा.पण पहिले नागपुरात. कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
ReplyDeleteKEEP IT UP 👍👍👍🩷💐💐💐💐💐
Thank you so much for your kind remarks.Meera has really excelled in her fantastic write up ,after our zoom interview!
DeleteThank you for taking time to read the article.
thank you Meeratai for a very informative and interesting write up ! We always feel so inspired with Dr Menes gracious personality, her art and talent ,Congratulations and best wishes !
ReplyDeleteThank you so much Mrinal for your kind words. You are very kind.Coming from a talented music artist, means a lot.
DeleteThis is really inspiring Aruna.
ReplyDeleteThank you so much.
DeleteAs an artist, I find this incredibly creative and inspiring. Thank you, Aruna, for motivating me.
ReplyDeleteManasi Sant, thank you so much. Very kind of you.Would love to see your work. Is there a link to your work?
ReplyDelete