Sunday, 28 September 2025

३.४ - स्टेटस (करुणा नेहरकर)

स्टेटस

करुणा नेहरकर

अहो व्हाट्स अँप फेसबुक इंस्टाच्या
फक्त टोमण्यांनीच भरल्या भिंती
आत्मपारीक्षण करा जरा
असे सांगावे तरी किती?

उचलावे शब्द अन टाकावे स्टेटसला
होऊन बसलंय सोपं
बोट एक दुसऱ्याकडे दाखविताना
आपल्याकडची चार पहायला विसरलं 

नाही धमक तुमच्यात
समोरून काही विचारायची
देतात आधार तेव्हा तुम्हां
या social media च्या भिंती 

बरं!!! खरं सांगा त्यातील
किती विचार स्वतःचे असतात
आयजीच्या जीवावर बायजी होऊन
कसे बरे दिमाखात मिरवता 

शहाणपण तुम्ही त्यातून
दुसऱ्यांना किती शिकवता
अजाण तुम्ही दुसऱ्यांना नाही
स्वतःलाच हॊ फसवता 

नकारात्मकतेचे दुष्ट चक्र
सदैव सभोवताली असते
कारण नसे दुसरे
आपणच शब्दांनी ते पेरले 

तुम्हीच दिलेलं असतं
निमंत्रण नकारात्मकतेला
आठवा जेव्हा तुम्ही भिंती
Social media च्या सजविल्या 

मोठेपण येत नाही सांगून
आदरही मिळत नाही मागून
माझं स्थान आहे काय?
खात्री करा दर्पण पाहून 

Social media च्या भिंती
नाही तुमचं मन स्वच्छ करणार
जी एका थेंबाने गेली
हौदाने कशी भरून येणार?

प्रसिद्धीच्या हौसेपायी
बरंच काही गमावलं
नाही समाधान कुठे
सततचं टेन्शन मात्र कमावलं 

- करुणा नेहरकर, बर्नली, लॅंकेशायर.

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर