Sunday, 28 September 2025

५. कलादालन- अंतरंगांची बाग - मानसी संत

अंतरंगांची बाग

मानसी संत


तत्त्वज्ञानाच्या वर्गात शिकताना James Allen यांच्या 'As A Man Thinketh' या पुस्तकातील एक विचार मनाला स्पर्शून गेला:

“A man’s mind may be likened to a garden, which may be intelligently cultivated or allowed to run wild; but whether cultivated or neglected, it must, and will, bring forth. If no useful seeds are put into it, then an abundance of useless weed-

seeds will fall thereon, and continue to produce their kind.”

हा विचार वाचून जाणवलं – “मनाची बाग जर जपली नाही, तर तिच्यात नको असलेलं गवत आपोआप उगवतं. पण जर ती विवेकबुद्धीनं जोपासली, तर विचार, मनन आणि सद्गुणांची फुलं तिथं फुलतात.” याच भावनेतून या चित्राची निर्मिती झाली.

माध्यम - Mixed media on canvas

साहित्य - अक्रिलिक  रंग (कॅनवासवर), मोडेलिंग क्ले (3D परिणामासाठी), वाळू (घड्याळासाठी), मॉडेलिंग पेस्ट (पार्श्वभूमीचा पोत तयार करण्यासाठी)

कलाकार - मानसी संत

Email - manasi.sant4@gmail.com
Instagram - @theartbymanasi


16 comments:

  1. आपली चित्रकला/पेंटिंग, त्यामागील कल्पना आणि सोबतचा सुविचार सर्वच खूप छान आहे. पेंटिंग बद्दल दिलेल्या तांत्रिक माहितीमुळे ते अधिक डोळसपणे पाहता आलं. आपली कला अशीच वृद्धींगत होवो.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! आपल्या शब्दांनी प्रेरणा मिळाली. 🙏

      Delete
  2. अंतरंगाची बाग हा विचारच खूप छान आहे.पेरल ते उगवेल ! छान कल्पना 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद! तुमचं प्रोत्साहन खूप उभारी देणारं आहे. 🌸

      Delete
  3. Rajshree Shirbhate7 October 2025 at 22:12

    खूपचं छान कल्पना आणि मनाला पटणारा लेख.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद राजश्री!

      Delete
  4. तत्त्वज्ञानासारखा अवघड विषय आणि त्यातला गहन पण फारच सुंदर आणि उपयुक्त विचार. असा विषय आमच्यासाठी सोपा करून शब्दांमधून आणि चित्रकृतीमधून सांगितल्याबद्दल अभिनंदन! चित्राची संकल्पना, मिक्स मीडियाचा वापर आणि मांडणी सुंदर. हार्दिक अभिनंदन आणि तुमच्या चित्रकला आणि तत्त्वज्ञानामधील वाटचालीसाठी शुभेच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार! हे खूपच प्रेरणादायी आहे. 🎨

      Delete
  5. प्रथमदर्शनी वाटलं की रेड इंडियन/ नेटिव्ह इंडियन चं डोकं आहे.मग वाळूच्या घड्याळाकडे लक्ष गेलं. म्हटलं ही जरा वेगळीच भानगड दिसतीय.मग डोळ्यावर चष्मा लावला आणि जरा भितभितच मागचं तत्त्वज्ञान वगैरे वाचलं.मग पुन्हा पाहीलं आणि आवडलं.बाय द वे....बागेत तण उगवलं म्हणून कधीमधी बिघडत नाही. जमिन झाकली जाईलच शिवाय नतद्रष्ट माणसं पण येणार नाहीत...तोही म्हणलं तर फायदाच!

    ReplyDelete
    Replies
    1. तुमचा विनोदी आणि निरीक्षक दृष्टिकोन आवडला! खूप धन्यवाद! 😄

      Delete
  6. अरे व्वा

    छानच

    मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  7. प्रिय मानसी,
    एकेक तुझे पैलू उलगडत आहेत. ही सुरवात समजं. आपण करतं रहायचे असते. तुझी पेटिंग बघितली घरी आले होते तेव्हा. पुस्तक पेटी सभासद म्हणजे वाचन असणारच. वाचता वाचता असेच विचार येतात, शब्द सरसर उतरतात आणि थोड्याच वेळात लेखणीची झडप पडल्यावर उमटतात पांढऱ्या वर काळे करतात. अशीच चल पुढे...हुषार हर्षद आहेच बरोबर ...
    आता हे बघं काय आलं ते मनी..

    अंतर्यामी खळबळ झाली, मानसी मनी उमजली
    रंगोरंगी रेखा उधळी, अर्थपूर्ण कलाकृती निर्मीती
    सुविचारे ओतप्रत झोळी, क्षणोक्षणी शिंपण करी
    साठवण भावार्थाने ओली, सद्गुणी फुले अंबरी
    साहित्याची श्रीमंत रुजवण, सत् सत्य विवेक वर्धापन
    गळून जाती कुचके तण, समृद्ध जीवनी आनंदी क्षण

    खूप शुभेच्छा!
    अलका आजी

    ReplyDelete
    Replies
    1. अलका आजी, मनापासून धन्यवाद! तुझी उत्स्फूर्त कविता खूप आवडली! 💛

      Delete
  8. Very nice Manasi! Way to go! Look forward to your future creations.x
    Aruna Limaye Mene

    ReplyDelete
    Replies
    1. Your appreciation means a lot, Aruna! Thank you so much. 💛

      Delete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर