Sunday, 28 September 2025

७. चणे फुटाणे - वड्यांचा उपास (अमृता तलाठी)

वड्यांचा उपास

अमृता तलाठी 

उपास म्हटलं की पूजा-प्रार्थना आलीच परंतु काही खवय्यांसाठी ती एक संधी असते. रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काहीतरी  खाण्याच. मी खूप लहान असताना शाळेतल्या मैत्रिणी उपास करतात म्हणुन मीही करायचे अणि मग आई आणि आजी उपवासाचा डबा द्यायच्या. त्यात मग कधी खीर, तवकीरीची खांडवी, शेंगांड्याचा शिरा, रताळ्याची भाजी, सुंठीचे लाडू, तर कधी बटाट्याची भाजी, वरीचा भात साबुदाण्याची खिचडी, बटाट्याचा किस, उपवासाचा चिवडा, शेंगदाण्याची चिक्की, चिकूची बर्फी, साबुदाणा वडा, सुरणाची भाजी, भाजलेले करांदे, कणक, रताळी असे नानाप्रकार. सोबतीला एक बाटली भरून घरच ताज ताक. कधी कधी एकांतात विचार केला की ह्या सगळ्या सुंदर आठवणीनं डोळे भरून येतात.

लहानपणापासूनच मला भातुकली मांडून जेवण करायची आवड होती. अस असल तरी फार क्वचितच मी माझ्या आईला स्वैपाकात मदत केली असेल. असो, पण यू.के. ला आल्यावर मात्र माझ्या आयुष्यातील खरी खुरी भातुकली सुरू झाली. आपल्या ईकडे मिळतात तश्या इथे खूप भाज्या मिळत नाहीत परंतु उपलब्ध असणार्‍या भाज्यांचे मात्र वेगवेगळे प्रकार. साध बटाट्याचं उदाहरण घ्यायच झाल तर मार्केट मध्ये पिवळे, गुलाबी, पांढरे, जांभळे, तपकिरी, लाल रंगाचे व आकारात लहान मोठे, लांब. अश्या विविध व्हरायटीजचे मिळतात अणि आणि कोणता पदार्थ बनवायचा ह्या नुसार कोणता बटाटा निवडायचा हा मोठा प्रश्न निर्माण होतो, विशेषतः आपल्या पद्धतीच इंडियन जेवण बनवताना.

काल कार्तिकी एकादशी. सुमितला साबुदाणा वडे फार आवडतात. आणि मी दरवर्षी ते करते. ह्या आधी बटाट्याच्या प्रकारांचा अभ्यास करायची वेळ आली नव्हती कारण आजवर सगळे पदार्थ व्यवस्थित होत होते. पण काल मात्र साबुदाणा वडे काही केल्या होतच नव्हते. आणि मग ते नीट व्हावे म्हणून त्यात अजून बटाटा, दाण्याचा कूट टाकला. पण वड्याचा मात्र चिवडा होत होता. शेवटी आम्ही दोघांनी ते खाऊन पोट भरले. जोडीला फळ बटाट्याची भाजी होती पण वडे मात्र काही खाता आले नाहीत.

बरंच सारण शिल्लक होतं. शेवटी आज न राहून प्रयोग करायच ठरवलं. माझ्याकडे शिंगाड्याचं पीठ नव्हतं, त्यामुळे थोडं तांदळाचं पीठ टाकून वडे करायच ठरवलं.  वडे कुरकुरीत झाले अणि तेही अगदी कमी तेलकट. लोक उपवासाला वडे खातात पण ह्यावेळी आम्ही मात्र आमचा उपवास वडे खाऊन सोडला!

- अमृता तलाठी (अमृता सुमित शेठ), डिडकॉट, यु.के.

(माझं लिखाण माझ्या वडिलांना समर्पित!)

4 comments:

  1. नवीन देशात आल्यावर असेच अनुभव सगळ्यांना येतात. पण आपण ते अतीशय मनोरंजक पध्दतीने वाचकांसमोर सादर केले आहेत. अभिनंदन. अशाच लिहित रहा.

    ReplyDelete
  2. माझे वडे फसले असते तर लोक मला "ना वडे कर" म्हणाले असते.

    ReplyDelete
    Replies
    1. ha ha . Perfect upama.. Khanyacha nahi tar shabdik

      Delete
  3. “वड्यांचा उपवास” — यू.के.मधला मराठी खवय्यांचा हलका संघर्ष 😄🥔

    लहानपणी दिवाळी अंक म्हणजे एक वेगळीच उत्सुकता असायची —
    पानं उलटताच नवीन गोष्टी, मजेशीर लेख आणि लहानसहान अनुभवांवरची लेखनं सापडायची.
    त्या काळात अंक फक्त वाचायचो, पण एक दिवस माझंही काही छापून यावं, ही लहानशी इच्छा मनात होती.

    आणि यंदा ती इच्छा पूर्ण झाली — माझा छोटासा विनोदी लेख “वड्यांचा उपवास” ‘पश्चिमाई दिवाळी विशेषांकात’ प्रकाशित झाला आहे! 🎉

    यू.के.मध्ये राहायला आल्यावर लक्षात आलं — इथं वडे करण्यासाठी योग्य बटाटा शोधणं म्हणजे एक मिशनच! 🥔 पण शेवटी जेव्हा गरमागरम वडा प्लेटमध्ये येतो, तेव्हा वाटतं — उपवास नाही, हा तर विजय सोहळा! 😄

    ‘पश्चिमाई दिवाळी अंक’ हा यू.के. आणि युरोपमधील मराठी लेखक–वाचकांना जोडणारा एक सुंदर उपक्रम आहे —
    परदेशात राहूनही मराठी भाषेचा, संस्कृतीचा आणि विनोदबुद्धीचा सुगंध जपणारा.माझं लिखाण या अंकात प्रकाशित केल्याबद्दल ‘पश्चिमाई’ संपादक मंडळाचे मनःपूर्वक आभार.

    लवकरच सुरू होत असलेल्या दिवाळीच्या सर्वांना स्वादिष्ट, प्रकाशमय शुभेच्छा! 🪔💛

    - Amruta

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर