Sunday, 28 September 2025

३.३ - प्रेम म्हणजे (प्राची जावडेकर)

प्रेम म्हणजे

प्राची जावडेकर 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं

सक्काळी उठल्या उठल्या पहिला मेसेज चेक करता?
झोपेतसुद्धा मोबाईल उशीपाशीच ठेवता?
काय म्हणता? Last seen चेक करत उशिरापर्यंत जागता?
मिशीतल्या मिशीत किंवा गालातल्या गालात दिवसभर हसत असता?
म्हणजे मग झालं तर! घोडं गंगेत न्हालं तर!
व्हर्च्युअल जरी असलं, तरी बाव्वनकशी ‘जेम’ असतं
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं

ज्या प्रोफाइलला आपण हळूच पहात असतो,
तिथं typing दिसणं ...म्हणजेच feeling loved असतं.
आणि online दिसूनही blue tick न दिसणं
काय सांगू? लईलईच जड असतं..
Hmm, OK, yes, no यापुढे गोष्ट जाते

“J1 झालं का” ला केव्हाच bypass करते..
काहीतरी वेडं फुलतं, त्याला काही name नसतं..
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं..

मोठ्ठं बदाम पोस्टूनसुद्धा प्रेम करता येतं.
Hi, GM म्हणूनसूद्धा प्रेम करता येतं.
स्टेटस वरचा पहिला view म्हणजेसुद्धा प्रेम असतं.
Insta वरची पहिली comment म्हणजेसुद्धा प्रेम असतं
Reply बिप्लाय न करता गप्प रहाणं प्रेम असतं
DP बदलून त्रास देणं हेदेखील प्रेम असतं.

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी अगदी सेम असतं

- प्राची जावडेकर, मॅंचेस्टर, यु. के. 
(पाडगाकरांची माफी मागून...)

1 comment:

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर