जय जय रामकृष्ण हरी
पूनम पाटील
२२ देशांतून १७००० किमी चा प्रवास करून पंढरपूरहून निघालेल्या श्री विठ्ठलाच्या पादुका आषाढी एकादशीला लंडनला पोचल्या. तमसा (Thames) नदीच्या तटी भक्तीचा महापूर लोटला होता. ढोलताशांसह विठ्ठल नामाचा जयघोष सुरु होता. इंग्लंडमधील गावागावातून या पादुकांची मिरवणूक निघाली. भजन, कीर्तन आयोजित करून प्रत्येक गावात या पादुकांचं भक्तिभावे स्वागत झालं. वारकरी परंपरेच दर्शन नवीन पिढीला पण अनुभवता याव या करता मँचेस्टरमधील यंदाच्या गणेशोत्सवात विठ्ठल-रखुमाई या थीमवर लहान मुलांची नाटकं, नृत्यं असे विविध कार्यक्रम बसवले होते. त्याचबरोबर आपल्या सुंदर सुंदर चित्रांतून डिंगूच्या बालमित्रांनी विठ्ठल पादुकांचे स्वागत कसे केले याची ही एक झलक.
- पूनम पाटील, मँचेस्टर, यु. के.
मुलांनी काढलेले प्रत्येक चित्र खूप बोलके आहे. पादुका सोहळ्याच्या निमित्ताने आपण लहान मुलांमधे याही विषयात रूची निर्माण केली याबद्दल मंडळाचे अभिनंदन. चित्रकलेच्या माध्यमातून वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवण्याचा आपला उपक्रम नक्कीच स्तुत्य आहे.
ReplyDeleteBeautiful and creative drawings. Thanks for sharing. सर्व मुलांना खूप शुभेच्छा - श्रीकांत कांबळे
ReplyDeleteखूपचं छान चित्रे, विठ्ठलाची थेट कनेक्ट करणारी
ReplyDeleteमुलांनी आपल्या कल्पनेतून काढलेली सुंदर विठ्ठल -रखुमाई .
ReplyDeleteपंढरपूरच्या विठोबाची ओढ इतकी निरागस, की ती मँचेस्टरपर्यंत पोहोचली!
ReplyDeleteया ओढीतून भक्तीचा, संस्कारांचा आणि एकतेचा सुगंध दरवळतो.
मुलांच्या सुंदर सहभागाचं मनःपूर्वक अभिनंदन,
पालकांच्या प्रोत्साहनाला सप्रेम सलाम,
आणि या सर्व कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद!
विठ्ठल रखुमाई ची खूपचं सुरेख बोलकी
ReplyDeleteचित्रे. सगळ्या चित्रकारांचे अभिनंदन.