अभंग : ए आय माउली
नेहा बापट अन्वेकर
कर कटावरी ठेवुनी निवांत
प्रश्न सुटले आता शून्य मिनिटात।
प्रश्न सुटले आता शून्य मिनिटात।
असे ज्ञान देते, अॅलेक्सा घरोघरी
बोला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।
भला मोठा आहे, गूगल बाईंचा थाट
तुका म्हणे यांनी सोपी केली पायवाट।
रिअल टाइम ट्रॅफिक, आयुष्य सोपं करी
बोला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।
सुंदर ते ध्यान, इन्स्टॉल्ड मोबाइलवरी
चॅट जीपीटीच माझी गीता, माझी ज्ञानेश्वरी।
काय वर्णू यांचे गुण हेच सर्वोपरी
बोला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।
सिरीकडे उत्तर, प्रश्न कितीही अतरंगी
आनंदाचे डोही, आनंद तरंगी।
ज्ञानाची वारी, आम्ही ए आय चे वारकरी
बोला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।
अख्या जगाला ही कशी टेक्नॉलॉजी गावली
नेहा म्हणे विठ्ठला, बघतोस न रे ही ए आय माउली।
या माउलीने घातला केवढा मोठा घाट
भविष्यात किती नौकऱ्याची लागणार वाट।
विठुराया पाठिराखा, त्यास काळजी खरी
बोला रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी।
- नेहा बापट अन्वेकर, स्टॅफोर्ड, यु. के.
NI प्रत्येक ओळीत दिसतोय,😃
ReplyDeleteधन्यवाद 🙏
Deleteधन्यवाद 🙏
Deleteवाहवा खूप छान. आम्ही AI चे वारकरी. जय जय रामकृष्ण हरी.
ReplyDeleteधन्यवाद 🙏
ReplyDeleteवाह नेहा खूप छान जय जय राम कृष्ण हरी
ReplyDelete