मैत्री
उल्का चौधरी
सुंदर हे नाते व त्याचे स्वरूप
मऊ लोणी कढवलेले तूप
रंगीन मधूर और नाजूक
असे हे नाते... असे हे नाते...
तरंग लांबी जुळून येते
नाही रक्ताची नाते
मन कुठे वाहून जाते
जेव्हा भेट होते
असे हे नाते...
वर्तमानातून ते भूतकाळात
प्रवास होतो तो काहीच क्षणात
आटते ते सगळे दुःख
राहते फक्त सुख
असे हे नाते...
दुःख आटवण्यासाठी
सुख साठवण्यासाठी
देवाने पाठवलेले देवदूत
ज्या नात्याची आहे खात्री
सुंदर छत्री
म्हणजे
सिर्फ और सिर्फ
मैत्री
- उल्का चौधरी, लॉर्डसली, स्टॅफोर्डशायर.
वाह वा ,सुंदर छत्री आणि मैत्री आवडलं .
ReplyDelete