धुंद वादळाची होती...
- रवी दाते
ऑफिसमधून निघायला आज खरं तर थोडा उशीरच झाला होता, पण बायको माहेरी गेल्यामुळे घरी लवकर
पोहोचायची घाई नव्हती. ऑफिस मधील तुंबलेली कामे संपवून घरी निघणार इतक्यात वसंताचा
फोन आला. त्याने कौलेज री-युनियनचा प्लॅन केला होता आणि सगळ्या जुन्या
मित्र-मैत्रिणींना बोलावले होते.
त्या फोनने अनेक जुन्या आठवणी मनात दाटल्या गेल्या. कित्येक
वर्षात मी कोणाला भेटलो नव्हतो. कामाच्या व्यापात ऑफिस, घर, संसार, मुले, त्यांच्या शाळा या पलीकडे आयुष्याकडे बघायला
वेळच मिळाला नव्हता. मला ते शाळेतले दिवस आठवले. तेव्हा मी क्रिकेट टीमचा कॅप्टन
होतो. माझ्या फटकेबाजीवर आणि स्पिन अटॅक वर सगळी शाळा खूश होती. कित्येक मुली
माझ्यावर फिदा होत्या. माझ्याशी दोन शब्द बोलायला मिळावेत म्हणून त्यांच्यात चढाओढ
असायची. पण माझी नजर मात्र फक्त तिच्यावर असायची. ती फारशी कोणाशी बोलायची नाही
किंवा माझ्याशीही बोलायचा तिने कधी प्रयत्न केला नव्हता. पण तिची नजर बरंच काही
सांगून जायची. त्या नजरेत काय नव्हतं? प्रत्येक बॉलला
षटकाराची अपेक्षा होती, प्रोत्साहन होतं, फटक्यागणित मिळणारा आनंद होता, विजयाचा जल्लोष होता.
अजूनही बरंच काही होतं, ते हवहवसं वाटायचं; पण नक्की काय हे कळायचं ते वयच नव्हतं. तिचं ते बघणं मला आवडायचं. तिचे
कटाक्ष मला खुणावायचे. पण आपणहून कधी तिच्याशी बोलायला आपण गेलोच
नाही. कदाचित आपल्या वृथा अभिमानाने किंवा गर्वाने असेल आणि तीही कधी स्वतः हुन
बोलायला आली नाही.
मग तो एक दिवस उगवला. वेळ संध्याकाळची होती. पावसाची रिपरिप
नुकतीच चालू झाली होती. संधी प्रकाश अजूनही असल्याने आकाशात फिकटसर इंद्रधनुष्य
होतं. काही कारणाने बसेस बंद होत्या. ती एकटीच बसस्टॉपवर बस किंवा दुसऱ्या
कुठल्याही वाहनाची वाट पाहत उभी होती. आपल्यालाही राहावले नाही. आपण तिला लिफ्ट
ऑफर केली. तिनेही न संकोचता ती स्वीकारली. स्कूटरवर मागे आधी सावरून बसली पण
स्कूटरने वेग पकडल्यावर अलगदपणे आपल्या कमरेभोवती विळखा घालून बिलगून बसली. तिचा
तो पहिला स्पर्श त्या वातावरणात बेभान करायला पुरेसा होता. तिला घरी सोडल्यानंतर
कितीतरी वेळ तो स्पर्श अंगावर रेंगाळत राहिला होता.
नंतर काय झाले कोणास ठाऊक, त्या दिवसानंतर ती पुन्हा कॉलेजात कधी दिसलीच नाही. कोणालाही न सांगता दिसेनाशी झाली अंधार पडल्यावर नाहीशा होणाऱ्या सावलीसारखी. पण त्या धुंद वादळी रात्रीतील तिच्या आणि माझ्या अव्यक्त प्रीतीच्या आठवणींनी मी मात्र बरेच दिवस बेचैन होतो. कधीतरी ती येईल आणि आपले प्रेम व्यक्त करायची संधी मला देईल या आशेवर मी होतो. हळूहळू धूसर होत गेलेल्या त्या रात्रीच्या आठवणी आज वसंताच्या फोनने पुन्हा चाळवल्या गेल्या.
या विचारांच्या तंद्रीतच मी घराकडे चाललो होतो. आज घरी कोणी
वाट पाहणारे नव्हते त्यामुळे थोडी घ्यायला हरकत नव्हती म्हणून एका बारमधे थांबलो.
ओल्ड मंक आणि तिच्या आठवणीत किती वेळ बसलो कल्पना नाही. पण बऱ्याच उशिरा घरी जायला
निघालो आणि अचानक
वळणावरून कोणीतरी हाक मारल्याचा भास झाला. भास समजून दुर्लक्ष करून पुढे जाणार
इतक्यात पुन्हा तीच हाक. इतक्या वर्षात बायको शिवाय दुसऱ्या स्त्रीच्या हाकेची सवय
नसल्याने थोडासा भांबावलोच आणि वळून बघतो तर साक्षात तीच उभी होती, चक्क मला बोलवत. क्षणभर माझा डोळ्यांवर विश्वासच बसेना. आपल्या विचारामुळे
होणारा हा भास असणार अशी मला खात्री होती. मी तसाच पुढे जाणार इतक्यात पुन्हा तीच
हाक. आता मात्र मी आपणहून तिच्यासमोर जाऊन विचारले “तूच ना?”
“हो रे, ओळखलंस तू?”
“तुला कसा विसरेन?”
“असं कसं? आपण तर कधी बोललोही नव्हतो.”
“हो, पण तू न बोलता बरेच काही सांगायचीस. बर, ते जाऊ दे. तू आता इथे कशी? कुठे होतीस इतकी वर्ष? आणि त्या दिवसानंतर अचानक नाहीशी कशी झालीस?”
“अरे थांब थांब. किती प्रश्न विचारशील? तुला वेळ असेल तर कुठेतरी बसून बोलूया का?” (नेकी और पूछ पूछ?)
“तू सांग कुठे ते. स्टारबक्स का माझं घर? इथे कोपऱ्यावरच आहे. पावसाचा जोर ही वाढतोय तुला चालणार असेल तर घरी चल. मस्त कॉफी करतो मी.” (एवढा कसा धीट झालो मी?) ती मानेनेच हो म्हणाली.
दोघं घरी आलो. फ्रेश होऊन ती स्थिर सावर होईपर्यंत मी कॉफी बनवली. कॉफी घेताना तिची नजर आमच्या फॅमिली फोटोवर पडली.
ही सुनीती, माझी बायको आणि हा राहुल आणि हा रवी. माझी मुलं. आता होस्टेलला असतात. सुनिती माहेरी गेली आहे.
“म्हणजे तुला रान मोकळं” असे म्हणून ती खट्याळपणे
हसली.
“थट्टा सोड, तू इथे कशी? बाय द वे तुला भेटायच्या थोडा वेळ आधी वश्याचा फोन आला होता. पुढच्याच आठवड्यात री युनियन आहे. तू नक्की यायचंस हं.”
“ते जमेलस वाटत नाही.” (अरेरे)
“का ग?”
“आधी मी इथे कशी ते सांगते, मग पुढचं बोलू. माझे बाबा जुन्या... खरं तर बुरसटलेल्या विचारांचे होते. त्या दिवशी तुझ्याबरोबर मला स्कूटरवर बघून खूपच घास्तावले. समाज काय म्हणेल? मुलीचं लग्न होईल का? एक ना दोन शंभर प्रश्नांनी त्या रात्री त्यांना झोप आली नाही. आता नुसतं या विचारांनीही हसू येतं पण दुसरेच दिवशी त्यांनी जागा बदलायचा निर्णय घेतला. नंतर काही दिवसांतच त्यांनी माझं लग्न जमवलं. मनोहर डॉक्टर होते. युकेला जाऊन उच्च शिक्षण घेण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि त्यांनी ती पूर्णही केली.”
यानंतर ती बराच वेळ मनोहर आणि मुलांबद्दल बोलण्यात ती रंगून गेली. अजून दोन कॉफी आणि जेवणही झाले.
“पण अजून तू सांगितल नाहीस, तू
इथे कशी ते?”
“एके दिवशी आम्ही स्कॉटलंडला सहलीसाठी गेलो होतो आणि हवा अचानक बदलली. बघता बघता वादळ सुरू झालं. पावसाने जोर धरला आणि गाडी आडोशाला नेऊन थांबतोय तोच एक मोठ्ठं झाड गाडीवर कोसळलं.” तिला हुंदका आला. “मनोहर आणि मुलं...” इतकं बोलून ती पुन्हा थांबली. तिला आवेग आवरेना. (अशा वेळी खांदा देणं स्वाभाविक होतं पण मी स्वतःला सावरलं.) मी तिला मनसोक्त रडू दिलं.. आवेग शांत झाल्यावर ती सावरून बसली आणि अचानक विषय बदलून म्हणाली “त्या दिवशी तू स्कूटरवरून सोडल्यावर तुझ्याशी काही बोलणं झालंच नाही आणि काय सांगायचं ते मनातच राहून गेलं. गैरसमज करून घेऊ नकोस. तुझा संसार मोडायला मी आले नाही. फक्त मनातली गोष्ट मनात राहू नये म्हणून तुला कधीतरी सांगायचं होतं....”
“काही सांगायची गरज नाही. तू भेटलीस हेच खूप आहे. मलाही बहुधा तेच सांगायचं होतं. पण तू कधी संधीच दिली नाहीस.”
“तुला नसेल, पण मला हे बोलणं आवश्यक होतं....आहे. मला तू किती आवडायचास हे मला कधी तुला सांगताच आलं नाही. त्या रात्री नंतर मी स्वतःला कसं सावरलं हे माझं मलाच माहीत. मनोहर असताना हे बोलणं शक्य नव्हतं; पण नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी मनावरचं हे ओझं उतरवणे आवश्यक होतं. आता तुझ्याशी बोलल्यावर कसं मोकळ मोकळ वाटतंय.”
नंतर काही वेळ ती नुसतीच माझ्याकडे एकटक पाहत राहिली. जणू काही जितकं जमेल तितकं मला आपल्या नजरेत साठवून घेत होती. या अशा अनपेक्षितपणे दिलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे मीही जागच्या जागी खिळून बसलो होतो.
मग अचानक ती उठली “बरं, निघते मी. उशीर झालाय.” असं म्हणून जायला निघाली.
आणि जशी अचानक भेटली तशीच निघूनही गेली.
दुसऱ्या दिवशी उठलो तेंव्हा डोके जरा जड झाले होते. बहुधा काल
रात्री थोडी जास्तीच झाली असावी. एक मस्त कडक कॉफी बनवली आणि पेपर वाचत बसणार
इतक्यात वश्याचा पुन्हा फोन आला. अरे काल ॲबर्डीनच्या मंदारचा फोन आला होता...
तुझी ती “ती” आणि तिची आख्खी फॅमिली कार ॲक्सिडेंटमध्ये गेली म्हणून.
- रवी दाते, मॅंचेस्टर, यु. के.
नंतर काय झाले कोणास ठाऊक, त्या दिवसानंतर ती पुन्हा कॉलेजात कधी दिसलीच नाही. कोणालाही न सांगता दिसेनाशी झाली अंधार पडल्यावर नाहीशा होणाऱ्या सावलीसारखी. पण त्या धुंद वादळी रात्रीतील तिच्या आणि माझ्या अव्यक्त प्रीतीच्या आठवणींनी मी मात्र बरेच दिवस बेचैन होतो. कधीतरी ती येईल आणि आपले प्रेम व्यक्त करायची संधी मला देईल या आशेवर मी होतो. हळूहळू धूसर होत गेलेल्या त्या रात्रीच्या आठवणी आज वसंताच्या फोनने पुन्हा चाळवल्या गेल्या.
“तुला कसा विसरेन?”
“असं कसं? आपण तर कधी बोललोही नव्हतो.”
“हो, पण तू न बोलता बरेच काही सांगायचीस. बर, ते जाऊ दे. तू आता इथे कशी? कुठे होतीस इतकी वर्ष? आणि त्या दिवसानंतर अचानक नाहीशी कशी झालीस?”
“अरे थांब थांब. किती प्रश्न विचारशील? तुला वेळ असेल तर कुठेतरी बसून बोलूया का?” (नेकी और पूछ पूछ?)
“तू सांग कुठे ते. स्टारबक्स का माझं घर? इथे कोपऱ्यावरच आहे. पावसाचा जोर ही वाढतोय तुला चालणार असेल तर घरी चल. मस्त कॉफी करतो मी.” (एवढा कसा धीट झालो मी?) ती मानेनेच हो म्हणाली.
दोघं घरी आलो. फ्रेश होऊन ती स्थिर सावर होईपर्यंत मी कॉफी बनवली. कॉफी घेताना तिची नजर आमच्या फॅमिली फोटोवर पडली.
ही सुनीती, माझी बायको आणि हा राहुल आणि हा रवी. माझी मुलं. आता होस्टेलला असतात. सुनिती माहेरी गेली आहे.
“थट्टा सोड, तू इथे कशी? बाय द वे तुला भेटायच्या थोडा वेळ आधी वश्याचा फोन आला होता. पुढच्याच आठवड्यात री युनियन आहे. तू नक्की यायचंस हं.”
“ते जमेलस वाटत नाही.” (अरेरे)
“का ग?”
“आधी मी इथे कशी ते सांगते, मग पुढचं बोलू. माझे बाबा जुन्या... खरं तर बुरसटलेल्या विचारांचे होते. त्या दिवशी तुझ्याबरोबर मला स्कूटरवर बघून खूपच घास्तावले. समाज काय म्हणेल? मुलीचं लग्न होईल का? एक ना दोन शंभर प्रश्नांनी त्या रात्री त्यांना झोप आली नाही. आता नुसतं या विचारांनीही हसू येतं पण दुसरेच दिवशी त्यांनी जागा बदलायचा निर्णय घेतला. नंतर काही दिवसांतच त्यांनी माझं लग्न जमवलं. मनोहर डॉक्टर होते. युकेला जाऊन उच्च शिक्षण घेण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती आणि त्यांनी ती पूर्णही केली.”
यानंतर ती बराच वेळ मनोहर आणि मुलांबद्दल बोलण्यात ती रंगून गेली. अजून दोन कॉफी आणि जेवणही झाले.
“एके दिवशी आम्ही स्कॉटलंडला सहलीसाठी गेलो होतो आणि हवा अचानक बदलली. बघता बघता वादळ सुरू झालं. पावसाने जोर धरला आणि गाडी आडोशाला नेऊन थांबतोय तोच एक मोठ्ठं झाड गाडीवर कोसळलं.” तिला हुंदका आला. “मनोहर आणि मुलं...” इतकं बोलून ती पुन्हा थांबली. तिला आवेग आवरेना. (अशा वेळी खांदा देणं स्वाभाविक होतं पण मी स्वतःला सावरलं.) मी तिला मनसोक्त रडू दिलं.. आवेग शांत झाल्यावर ती सावरून बसली आणि अचानक विषय बदलून म्हणाली “त्या दिवशी तू स्कूटरवरून सोडल्यावर तुझ्याशी काही बोलणं झालंच नाही आणि काय सांगायचं ते मनातच राहून गेलं. गैरसमज करून घेऊ नकोस. तुझा संसार मोडायला मी आले नाही. फक्त मनातली गोष्ट मनात राहू नये म्हणून तुला कधीतरी सांगायचं होतं....”
“काही सांगायची गरज नाही. तू भेटलीस हेच खूप आहे. मलाही बहुधा तेच सांगायचं होतं. पण तू कधी संधीच दिली नाहीस.”
“तुला नसेल, पण मला हे बोलणं आवश्यक होतं....आहे. मला तू किती आवडायचास हे मला कधी तुला सांगताच आलं नाही. त्या रात्री नंतर मी स्वतःला कसं सावरलं हे माझं मलाच माहीत. मनोहर असताना हे बोलणं शक्य नव्हतं; पण नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वी मनावरचं हे ओझं उतरवणे आवश्यक होतं. आता तुझ्याशी बोलल्यावर कसं मोकळ मोकळ वाटतंय.”
नंतर काही वेळ ती नुसतीच माझ्याकडे एकटक पाहत राहिली. जणू काही जितकं जमेल तितकं मला आपल्या नजरेत साठवून घेत होती. या अशा अनपेक्षितपणे दिलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे मीही जागच्या जागी खिळून बसलो होतो.
- रवी दाते, मॅंचेस्टर, यु. के.
No comments:
Post a Comment
प्रतिसाद