Saturday, 24 January 2026

३.४ आठवण (करुणा नेहरकर)

 आठवण

– करुणा नेहरकर

सहजच विचारून गेला तो 
आठवण येते का तुला 
मीही सहजच उत्तरले 
नाही येत आठवण मला
 
यायला आठवण कोणाची 
आधी विसरायला लागतं 
विसरलो आपण कोणाला 
तर मग त्यांची आठवण काढतो 

प्रेमाची खरी परिभाषा 
ना शब्दात येत गुंफता 
प्रेम किती तुझ्यावर
सांग कसं सांगू मी आता?

आहे प्रेम किती तुझ्यावर
हे सांगायला नाही लागत
कृतीतून सदा तुमच्या
राहते ते सदैव झळाळत

आपुलकीचे चार शब्द
बरसवितात प्रेमाच्या सरी
आदर करून एकमेकांचा
नाती जपतात जन्मभरी

– करुणा नेहरकर

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर