Saturday, 24 January 2026

३.१ प्रीती, संतऱ्याच्या गावाची (श्रीकांत पट्टलवार)

प्रीती, संतऱ्याच्या गावाची 

श्रीकांत पट्टलवार 



बरीच वर्ष इंग्लंडमधे राहिल्यावर आपल्या बालपणीच्या गावाला, नागपूरला, तेही हिवाळ्याच्या दिवसात जाण्याची मजा काही औरच. बाजारातून चक्कर मारल्यावर मुबलक आणि स्वस्तात मिळणारी कोथिंबीर, मेथी यांच्याबरोबरच इतर ठिकाणी क्वचितच मिळणारी चवळी किंवा पांढरी रताळं पाहून मन उचंबळून आलं आणि हे गीत सुचलं....

गोड  संतऱ्याच्या गावी, माझ्या मामाचं  हो घर
त्याला सांगा आम्ही आलो त्याचा लोभ आम्हावर
राही कामात तो दंग, त्याची ख्याती दूर दूर
रोज गोड खाऊ देई  मामी लळा लावी फार .. ।।धृ।।

माझ्या मामाच्या गावाचे काका मामा किती छान
रोज रोज आम्हा मिळे आग्रहाने पाहूणचार
माझ्या मामाच्या गावाला  मिळे चवळी नी घोळ
आंबा बैगमपल्ली आणि किती गोड ती रताळ ।।१।।

माझ्या मामाच्या मामाच  शेतं आहे सोन्यावानी 
विठ्ठलाच्या रंगावानी  त्याची माती काळी शार
मिळे वांग्याचे भरीत आणि वाणीचा हुरडा 
संगे मिरचीचा तो ठेचा वरती तेलाची हो धार ।।२।।

माझ्या मामाच्या गावाला टेकडीचा तो गणेश
तोच एक देव अमुचा  त्याचा महिमा थोर
नमुन या गणेशाला  अर्पू गाण्याची ही माळ
सुखी ठेव या साऱ्यांना तुला भेटू वारंवारं ।।३।।

गोड संतऱ्याच्या गावी माझ्या मामाच हो घरं...

श्रीकांत पट्टलवार, रुणकर्ण, यु. के. 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर