Saturday, 24 January 2026

४.३ गप्पा टप्पा - क्रिकेटपटू अभिषेक कुलकर्णी (मीरा पट्टलवार)

क्रिकेटपटू अभिषेक कुलकर्णी

क्रिकेट म्हणजे प्रत्येक भारतीयाचा जीव की प्राण.  त्यातही हा खेळ अत्यंत लोकप्रिय असल्यामुळे प्रत्येक पातळीवर निवड होण्यासाठी कठीण स्पर्धा आणि खूप चढाओढ असते. पण या खेळाचे वेड एवढे की प्रत्येक जण खूप प्रयत्नशील असतो. या पार्श्वभूमीवर इंग्लंडमधील क्लब पातळीवर (जूनियर वगळता) ४८ सामन्यातून ७२८३ धावा, ४५ अर्धशतकं आणि ८ शतकं असं घवघवीत यश संपादन करणारा क्रिकेटपटू अभिषेक कुलकर्णी याचा चढत्या क्रमांकाचा आलेख नक्कीच वाखाणण्यासारखा आहे.

अभिषेक, तुझं क्रिकेटचं वेड खरंच कौतुकास्पद आहे. तर इंग्लंडमधील क्रिकेटचा तुझा प्रवास कसा आणि कुठून सुरू झाला?  
माझा क्रिकेट प्रवास सुरू झाला मँचेस्टर मधील व्हॅली-रेंज क्रिकेट क्लबच्या U11 संघातून. तयारीत मी सुरुवातीपासूनच वयाच्या मानाने एक-दोन वर्ष  पुढेच असायचो. सतत ३ वर्ष मी  मॅंचेस्टर डिस्ट्रिक्टला जूनियर संघाचा यशस्वी कप्तान होतो. U12 आणि U13 साऊथ मॅंचेस्टर जुनियर क्रिकेट लीग चॅम्पियनशिप ही बक्षिसं  आम्ही  लवकरच पटकावली. तसंच मला व्हॅली रेंज क्रिकेट प्लेयर ऑफ द सीजन ही पारितोषिके २०११, २०१३ आणि २०१६ अशी तीन वेळ मिळाली.
लँकाशायर काऊंटी क्रिकेट बोर्ड फेस्टिवल हा आठवडाभर चालणारा महोत्सव म्हणजे क्रिकेटपटूंसाठी सुवर्णसंधी. यामध्ये नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट अशी वेगवेगळी पथकं असतात. वेगवेगळ्या सामन्यातून आयोजक खेळांडूची क्षमता, प्रतिभा आणि कौशल्य बारकाईने बघतात. तुमची कामगिरी छान झाली तर तुम्हाला राष्ट्रीय स्तरावर विविध वयोगटाचं प्रतिनिधित्व करायला मिळतं आणि विविध काउंटीजतर्फे खेळण्यासाठी तुमची निवड होते. लँकाशायर क्रिकेट बोर्डातर्फे मला सुरवातीलाच या प्रेस्टिजियस लँकाशायर काउंटी U14 संघात संधी मिळाली आणि तिथपासून मी सलग U19 काऊंटी टीमपर्यंत खेळलो. इंग्लंडभर वेगवेगळ्या नामांकित ग्राउंड्सवर खेळायची संधी मिळाली. यातले काही खेळाडू आज प्रथम श्रेणी आणि इंग्लंड देशाच्या संघातही खेळतायत. उदा. टॉम हार्टली, मॅट पार्किंसन. मायकल जोन्स हा स्कॉटलंडसाठी खेळतो. मी कप्तान असताना आमच्या संघाला 'Lancashire Cricket Board U16’s Festival Champions' (2016) हे बक्षीस पण मिळालं.  
म्हणजे प्रगतिशील कामगिरीमुळे तुला बक्षिसं तर सतत मिळतच होती. पण पुढे व्यावसायिक खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी कशी मिळाली?
A-लेव्हल नंतर २०१६-१७ मध्ये एक वर्ष गॅप घेऊन मी मुंबईत स्टार क्रिकेट क्लबमध्ये वर्षभर तज्ञांकडून क्रिकेटचं तंत्रशुद्ध आणि सर्वांगीण विकास होईल असं प्रशिक्षण घेतलं - आमच्या रोजच्या प्रशिक्षणात आम्हाला कधी १०० रन करायचे कधी विकेट करायच्या असं लक्ष्य असायचं. नंतर हळूहळू प्रशिक्षक म्हणायचे तुम्ही १०० रन करू शकता म्हणजे तुम्ही नक्कीच २०० सुद्धा करू शकता. क्रिकेट म्हणजे फक्त आऊट न होता खेळत राहणं असं नाही तर चांगला स्कोर, चांगली कामगिरी करून टीममध्ये चांगलं योगदान देता आलं पाहिजे. तुम्ही जे केले आहे त्यावर समाधानी राहू नका, तुम्ही ते करत राहिले पाहिजे. मुंबईच्या प्रशिक्षणात मी सर्वोच्च रन्स काढणारा खेळाडू ठरलो.
स्टार क्रिकेट क्लब मुंबई इथल्या प्रशिक्षणातून मला एक वेगळीच दृष्टी मिळाली. तिथुन परतल्यावर  मी चेशायरच्या प्रीमियर टीमपर्ली क्लबमध्ये खेळलो. या क्लब मध्ये प्रोफेशनल क्रिकेटर्स असायचे. इथे खेळल्यामुळे मला मौल्यवान अशी समज मिळाली. मी ओपनिंग, वन डाऊन किंवा टॉप थ्री पैकी बॅट्समन असायचो. मिडीयम फास्ट बोलिंगसुद्धा करायचो. कधी विकेट कीपिंग किंवा वेगवेगळ्या पोझिशनला फील्डिंग मी केली आहे पण जास्त फोकस माझा बॅटिंग वरच असायचा. २०२३ मध्ये टिंपरली क्लबमध्ये मला  प्रीमियर डिविजन मध्ये खेळण्यासाठी पदोन्नती मिळाली. क्लब ची २०२३ ची चॅम्पियनशिप पण  मला मिळाली.
आता मी व्हॅली रेंज या माझ्या बाळपणातल्या क्लबचा कप्तान आहे. 
क्रिकेटशिवाय तू काय करतोस?
मी टेबल टेनिस, बास्केट बॉल आणि बॅडमिंटन या वेगवेगळ्या खेळांत शाळेचा कप्तान होतो. मॅंचेस्टरला U15 साठी मी नॅशनल लेव्हलला बुद्धिबळ (चेस) मध्ये रिप्रेझेंट केलं होतं. कराटे ब्लॅक बेल्ट आणि इंग्लिश कराटे जूनियर चॅम्पियनशिपमध्ये मी चौथा आलो होतो. 
याशिवाय मी पोर्ट्रेट पेंटिंग आणि भारतीय संगीत कीबोर्डवर वाजवणे हे छंद जोपासायचा प्रयत्न करत असतो.  
अगदी लहानपणापासून क्रिकेटची सुरुवात करून आजपर्यंत मिळवलेली अनेक बक्षिसं असा अभिषेकच्या प्रगतीचा आलेख खूप मोठा आहे. नवोदित क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी क्रिकेट प्रशिक्षक होऊन इथून पुढेही या क्षेत्रात योगदान सुरू ठेवण्याचा अभिषेकचा मानस आहे.
लहानपणी एखादा ध्यास घेतला की तो प्रयत्नपूर्वक कसा पूर्ण करायचा हे अभिषेकच्या उदाहरणावरून घेण्यासारखे आहे. 'पश्चिमाई' तर्फे अभिषेकला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

11 comments:

  1. Well done Abhishek. It is not easy to chose between studies and sports. but you seem to have hit the balance.

    ReplyDelete
  2. Best wishes for your next dream project in your sports career.

    ReplyDelete
  3. वा. खूपच छान. पुढील यशासाठी अभिषेकला शुभेच्छा 👏👏

    ReplyDelete
  4. Well done Abhishek, Best Wishes

    ReplyDelete
  5. Well done Abhishek, and best wishes for future

    ReplyDelete
  6. Well done Abhishek पुढील यशासाठी अभिषेकला शुभेच्छा 👏👏

    ReplyDelete
  7. खूप छान वाटलं वाचून सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक अभिनंदन. तुम्ही खूप छान काम करत आहे आणि असेच करत रहा.
    काही गोष्टी सांगायच्या राहून गेल्या असतील कदाचित किंवा वेळेचा अभाव पण या प्रवासामध्ये फक्त अभिषेकलाच नाही पण असं बऱ्याच जणांच्या आयुष्यामध्ये काही कठीण प्रसंग येतात, ते कुठे नमूद केलेले नाही आहे. मला वाटते सगळ्यांनाच त्याच्यातून जावं लागतं तर असे एखाद -दोन भयानक आहेत कधीतरी पुढच्यावेळी संधी मिळाली तर अभिषेकला मी सांगीनच तुमच्याकडे ते सांगण्यासाठी. अजून महत्त्वाचं म्हणजे त्यांनी काही गोष्टी मेंशन केल्या नाहीत या खेळामध्ये भागीदारी खूप महत्त्वाची असते आणि ओपनिंग बॅटिंग करताना त्याला मोस्ट द टाईम ओपनिंग बॅटिंग संधी मिळाली आणि करताना ज्या पार्टनरशिप होतात त्या आपल्या संघाला जिंकण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. अशा मोठ्या भागीदारी खूप केल्यात अभिषेक ने, बऱ्याचदा वेगवेगळ्या संघातल्या प्लेयर्स बरोबर छोट्या छोट्या भागीदारी करून टिकून राहावं लागतं विकेटवर तेही खूप महत्त्वाचं काम अभिषेक सतत करत होता आणि त्याचेही मला कौतुक आहेच, खूप अभिमान आहे अभिषेक क्रिकेट आणि इतरही काही गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट घेऊन काम करतो.
    मला वाटतं मी त्याच्या जास्तीत जास्त मॅचेस बघितले आहेत आणि माझा शनिवार फार सुंदर जायचा. जेव्हा अभिषेक अंडर १८ खेळायचा तेव्हा त्याला सीनियर, ज्युनियर, मँचेस्टर, Lancashire cc असे बरेचसे फॉरमॅट एकेक आठवड्यामध्ये खेळावे लागायचे अक्षरशः रोज क्रिकेट असायचा, रोज मॅच असायची.
    तुमच्या या नवीन उपक्रमाला भरपूर यश मिळो💕🙏

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर