दिव्या महाजनचे सप्तसागर चॅलेंज
https://swimcatalina.org/swim-successes/
प्रेस्टन,
लँकाशायर मधील दिव्या महाजन, ही १५ वर्षांची एक यशस्वी जलतरणपटू.
१२ सप्टेंबर २०२५ ला
कॅलिफोर्निया जवळील कॅटलिना आयलंड ते मेनलँड मधील ४२ किमी अंतर तिने १५ तास २३ मिनिटे
सतत पोहून यशस्वीपणे काबीज केलं. गावातील नेहमीचा स्विमिंग पूल ते कॅटलिना आयलंड
हा तिचा जलतरण प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

बालपणापासूनच दिव्याला पोहण्याची आवड. स्विमिंग-पूल मधील लहान-मोठ्या स्पर्धांपासून मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, कोकणातील मालवण इथल्या समुद्रात पोहण्याने तिचा हा जलतरण प्रवास सुरू झाला. पुढे एकदा कलकत्त्यामध्ये १९ किलोमीटरचे अंतर तिने २ तास ४५ मिनिटात पूर्ण केल्यावर तिचा आत्मविश्वास खूपच वाढला आणि दिव्याने ओपन वॉटर्स पादाक्रांत करण्याचा निर्धार केला.
दिव्या, सर्व प्रथम कॅटलिना आयलँड मधील ओपन वाटर्स पादाक्रांत
केल्याबद्दल पश्चिमाई तर्फे तुझे मन: पूर्वक अभिनंदन. या सप्तसागर चॅलेंज साठी तुझा
प्रवास कसा सुरू झाला आणि त्यासाठी तू तयारी कशी सुरु केलीस?
एकदा मी माझ्या एका मैत्रिणीचं इंग्लिश चॅनेलमधलं स्विमिंग पाहिलं आणि तिथूनच मी ओपन वॉटर्स मध्ये पोहण्याचा ध्यास घेतला. माझे कोच श्रीकांत विश्वनाथन यांचे मला खूप मार्गदर्शन मिळाले. ते म्हणाले, जरी सोलो पोहायचे असले तरी सुरुवातीला तू रिलेमध्ये भाग घे. त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
मी
स्विमिंग पूल मध्ये रोज चार पाच तास सराव करायचे.
आठवड्याच्या शेवटच्या दिवशी चार ते पाच, पाच ते सहा, सहा ते सात अशा हळूहळू
वेळा वाढवत आपला स्टॅमिना वाढवला.
पण स्विमिंग पूल आणि समुद्रात पोहणं यात तर खूपच फरक असेल?
हो! प्रश्नच नाही स्विमिंग पूल मध्ये क्लोरीनेटेड वॉटर तर समुद्रात खार पाणी. समुद्रात एकल म्हणजे सोलो पोहायचं असल्यास तुम्हाला कमीत कमी सहा तास तरी न थांबता पोहोता आलं पाहिजे. तेवढे जमलं तर पुढील आठ तास कठीण वाटत नाहीत. ८ तासांचा सराव झाला की १४- १५ तास पोहणं म्हणजे निव्वळ मानसिक खेळं.
तू सांगतेस ते इतकं ते निश्चितच सोपं नाही. त्याकरता तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि पध्दतशीर सराव पण करावा लागत असेलच!
हो नक्कीच. सर्वप्रथम मी सहा जणांच्या रिले (साखळी) टीम मध्ये सहभागी झाले. ९ सप्टेंबर २०२५ ला आम्ही सेंट पेड्रो बंदरावरून बोटीने कॅटेलिना आयलँडला गेलो. एका विशिष्ट ठिकाणी आमची बोट थांबली आणि तिथून पहिल्या टीम मेंबरने पोहायला सुरुवात केली. प्रत्येक जण एक एक तास पोहतो. त्यानंतर टाळी देऊन दूसरा पुढील एक तास पोहतो. असं करत करत अंतिम लक्ष साध्य होईपर्यंत आमची ही साखळी सुरू होती. आम्ही हे अंतर १३ तासात पूर्ण केलं होतं. आमच्यासाठी तो खूपच आनंददायी आणि प्रेरणादायी क्षण होता. यातूनच मिळालेल्या आत्मविश्वासातून सप्तसागर चॅलेंज एकटीने पार करण्याच पहिलं पाऊल मी दोनच दिवसात उचललं.
११ सप्टेंबरला रात्री ११ वाजून ७ मिनिटांनी अंधारात मी सोलो प्रवास सुरू केला. समुद्रात दिवसा पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पोहण्यासाठी रात्रीचीच वेळे योग्य असते. सुरक्षिततेसाठी सपोर्ट टीमची एक मोठी बोट आणि आणि इतर टीम मेंबर्सच्या कायाक म्हणजे छोट्या बोटीपण सतत सोबत होत्या.
सुरुवातीचे ६-७ तास कसे गेले हे कळलं नाही पण हळूहळू दिवस उजाडायला लागला तेव्हा वाटलं की आपण अगदी जमिनीच्या जवळच आलो आहोत. पण तो भ्रम होता. मात्र बोटीतुनही सतत प्रोत्साहन मिळत होतं. त्यामुळे मी धीर सोडला नाही आणि पोहोणं सुरूच ठेवलं. आणि काय सांगू? पुढे काही तास गेले आणि तो सुवर्णक्षण आला. मी अगदी जमिनीजवळ पोचले होते. शेवटचे उरलेले अंतर मी बटरफ्लाय स्ट्रोकने पूर्ण केले. जमिनीला हात लागले तेव्हा १५ तास २३ मिनिटं झाले होते. मला इतका भारी वाटलं की ते मी शब्दात सांगू शकत नाही. माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं.
दिव्या तू हे आव्हान स्वीकारलंस पण समुद्रातील लाटा, जलचर प्राणी यामुळे काही अडथळे नाही आले? मी तर ऐकलंय की पॅसिफिक मध्ये खूप डॉल्फिन्स असतात?
रात्री पोहताना एक मोठ आव्हान असं होतं की बायोल्युमिनीसंट बॅक्टेरिया हे सतत प्रकाशित (ग्लो) होतात. पोहोताना त्यांचा प्रकाश दिसतो. पण मला हा प्रकाश बघायला आवडलं. तुम्ही पोहताना डॉल्फिन सुद्धा तुमच्या आजूबाजूला दिसतात पण ते तुम्हाला काही करत नाहीत.
तू हे एवढं अंतर महासागरात पार करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी कशी केलीस?
ओपन
वॉटर्स किंवा सागरात पोहण्याकरता विशेष तयारी लागते. ही तयारी
करण्याकरिता मी जवळच्या गावात जिथे ओपन सी आहे तिथे पोहण्याचा सराव केला. एकदा तर
खूप वादळी हवामान होते पण ह्यात मी मुद्दाम सराव करण्याचे ठरवले ज्यामुळे मला
वेगवेगळ्या पाण्याच्या प्रवाहाला कसे सामोरे जायचे याचा अनुभव आला. उदाहरणार्थ
लाटा मोठ्या असतील तर तुमचं पोहोणं सर्फर सारखं असावं जो लाटे बरोबर अलगद वर जातो तसं. थोडक्यात काय तर
तुम्हाला पाण्याच्या प्रवाहाची लय ओळखता आली पाहिजे आणि त्या प्रवाहाशी एकरूप होता
आलं पाहिजे. असं वादळी हवामानातील सरावामुळे मी प्रवाहाविरुध्द पोहोण्याचं तंत्र पण आत्मसात
केलं.
प्रशांत महासागरातील खवळणाऱ्या लाटा आणि क्रॉस करंट्स पार करत मोठ्या धैर्याने दिव्या रात्रभर पोहत राहिली आणि जेव्हा सूर्य उगवला तेव्हा तिने स्वतःला आठवण करून दिली की पर्वत हलत नाहीत मी त्यांच्याकडे जात आहे. सोडणे हा पर्याय कधीच नव्हता.
दिव्याचे वडील डॉक्टर हितेंद्र महाजन म्हणतात की आम्हाला जास्त अभिमान वाटतो तो केवळ तिने हा रेकॉर्ड केला याचा नाही. यश म्हणजे इतरांना वर उचलणे असा तिचा विश्वास आहे. 'मिशन सप्तसागर'च्या माध्यमातून ती मुलींना खेळ आणि शिक्षणाद्वारे सक्षम बनवू इच्छिते. दिव्याला वाटतं की जर मी हे करू शकते तर प्रत्येक मुलगी हे करू शकते. कॅटलिना ही तर फक्त सुरुवात आहे. आता मी सहा महासागर पार करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
बालपणापासूनच दिव्याला पोहण्याची आवड. स्विमिंग-पूल मधील लहान-मोठ्या स्पर्धांपासून मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, कोकणातील मालवण इथल्या समुद्रात पोहण्याने तिचा हा जलतरण प्रवास सुरू झाला. पुढे एकदा कलकत्त्यामध्ये १९ किलोमीटरचे अंतर तिने २ तास ४५ मिनिटात पूर्ण केल्यावर तिचा आत्मविश्वास खूपच वाढला आणि दिव्याने ओपन वॉटर्स पादाक्रांत करण्याचा निर्धार केला.
एकदा मी माझ्या एका मैत्रिणीचं इंग्लिश चॅनेलमधलं स्विमिंग पाहिलं आणि तिथूनच मी ओपन वॉटर्स मध्ये पोहण्याचा ध्यास घेतला. माझे कोच श्रीकांत विश्वनाथन यांचे मला खूप मार्गदर्शन मिळाले. ते म्हणाले, जरी सोलो पोहायचे असले तरी सुरुवातीला तू रिलेमध्ये भाग घे. त्यामुळे तुझा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
पण स्विमिंग पूल आणि समुद्रात पोहणं यात तर खूपच फरक असेल?
हो! प्रश्नच नाही स्विमिंग पूल मध्ये क्लोरीनेटेड वॉटर तर समुद्रात खार पाणी. समुद्रात एकल म्हणजे सोलो पोहायचं असल्यास तुम्हाला कमीत कमी सहा तास तरी न थांबता पोहोता आलं पाहिजे. तेवढे जमलं तर पुढील आठ तास कठीण वाटत नाहीत. ८ तासांचा सराव झाला की १४- १५ तास पोहणं म्हणजे निव्वळ मानसिक खेळं.
तू सांगतेस ते इतकं ते निश्चितच सोपं नाही. त्याकरता तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि पध्दतशीर सराव पण करावा लागत असेलच!
हो नक्कीच. सर्वप्रथम मी सहा जणांच्या रिले (साखळी) टीम मध्ये सहभागी झाले. ९ सप्टेंबर २०२५ ला आम्ही सेंट पेड्रो बंदरावरून बोटीने कॅटेलिना आयलँडला गेलो. एका विशिष्ट ठिकाणी आमची बोट थांबली आणि तिथून पहिल्या टीम मेंबरने पोहायला सुरुवात केली. प्रत्येक जण एक एक तास पोहतो. त्यानंतर टाळी देऊन दूसरा पुढील एक तास पोहतो. असं करत करत अंतिम लक्ष साध्य होईपर्यंत आमची ही साखळी सुरू होती. आम्ही हे अंतर १३ तासात पूर्ण केलं होतं. आमच्यासाठी तो खूपच आनंददायी आणि प्रेरणादायी क्षण होता. यातूनच मिळालेल्या आत्मविश्वासातून सप्तसागर चॅलेंज एकटीने पार करण्याच पहिलं पाऊल मी दोनच दिवसात उचललं.
११ सप्टेंबरला रात्री ११ वाजून ७ मिनिटांनी अंधारात मी सोलो प्रवास सुरू केला. समुद्रात दिवसा पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पोहण्यासाठी रात्रीचीच वेळे योग्य असते. सुरक्षिततेसाठी सपोर्ट टीमची एक मोठी बोट आणि आणि इतर टीम मेंबर्सच्या कायाक म्हणजे छोट्या बोटीपण सतत सोबत होत्या.
सुरुवातीचे ६-७ तास कसे गेले हे कळलं नाही पण हळूहळू दिवस उजाडायला लागला तेव्हा वाटलं की आपण अगदी जमिनीच्या जवळच आलो आहोत. पण तो भ्रम होता. मात्र बोटीतुनही सतत प्रोत्साहन मिळत होतं. त्यामुळे मी धीर सोडला नाही आणि पोहोणं सुरूच ठेवलं. आणि काय सांगू? पुढे काही तास गेले आणि तो सुवर्णक्षण आला. मी अगदी जमिनीजवळ पोचले होते. शेवटचे उरलेले अंतर मी बटरफ्लाय स्ट्रोकने पूर्ण केले. जमिनीला हात लागले तेव्हा १५ तास २३ मिनिटं झाले होते. मला इतका भारी वाटलं की ते मी शब्दात सांगू शकत नाही. माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं.
दिव्या तू हे आव्हान स्वीकारलंस पण समुद्रातील लाटा, जलचर प्राणी यामुळे काही अडथळे नाही आले? मी तर ऐकलंय की पॅसिफिक मध्ये खूप डॉल्फिन्स असतात?
रात्री पोहताना एक मोठ आव्हान असं होतं की बायोल्युमिनीसंट बॅक्टेरिया हे सतत प्रकाशित (ग्लो) होतात. पोहोताना त्यांचा प्रकाश दिसतो. पण मला हा प्रकाश बघायला आवडलं. तुम्ही पोहताना डॉल्फिन सुद्धा तुमच्या आजूबाजूला दिसतात पण ते तुम्हाला काही करत नाहीत.
तू हे एवढं अंतर महासागरात पार करण्याची शारीरिक आणि मानसिक तयारी कशी केलीस?
प्रशांत महासागरातील खवळणाऱ्या लाटा आणि क्रॉस करंट्स पार करत मोठ्या धैर्याने दिव्या रात्रभर पोहत राहिली आणि जेव्हा सूर्य उगवला तेव्हा तिने स्वतःला आठवण करून दिली की पर्वत हलत नाहीत मी त्यांच्याकडे जात आहे. सोडणे हा पर्याय कधीच नव्हता.
दिव्याचे वडील डॉक्टर हितेंद्र महाजन म्हणतात की आम्हाला जास्त अभिमान वाटतो तो केवळ तिने हा रेकॉर्ड केला याचा नाही. यश म्हणजे इतरांना वर उचलणे असा तिचा विश्वास आहे. 'मिशन सप्तसागर'च्या माध्यमातून ती मुलींना खेळ आणि शिक्षणाद्वारे सक्षम बनवू इच्छिते. दिव्याला वाटतं की जर मी हे करू शकते तर प्रत्येक मुलगी हे करू शकते. कॅटलिना ही तर फक्त सुरुवात आहे. आता मी सहा महासागर पार करण्याचे आव्हान स्वीकारले आहे.
- मीरा पट्टलवार,
ऋणकर्ण, यु.के.
वाह, दिव्या, २०२५ मध्ये सागरी जलतरणपटू भारतीय मुलींनी केलेल्या विक्रमात तुझे नाव कोरलेस या बद्दल अभिनंदन तुझे, तुझ्या कोच आणि सतत पाठीशी असणाऱ्या कुटुंबाचे! पुढील यशासाठी शुभेच्छा🏅
ReplyDeleteमीरा, वाचकांना छानशी ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद
wow, दिव्या, फारच मोठी झेप घेतलीस इतक्या लहान वयात, जेंव्हा इतर मुले काय करू आता अशा प्रश्नात अडकलेली असतात
ReplyDeleteReally impressive and outstanding achievement. Best wishes Divya
ReplyDelete