प्रेम व्हर्सेस लग्न
- नेहा बापट अन्वेकर
प्रेम गार वाऱ्याचा शहारा, लग्न अंगावर काटा
प्रेम उडान उन्मुक्त गगनाची, लग्न बंद झाल्या सर्व वाटा
प्रेम ताजमहाल, लग्न दहा बाय दहाची खोली
प्रेमात तू म्हणशील तसं, लग्नानंतर तू काहे को बोली
प्रेमात गुपचूप गप्पा, लग्न पोल खोल
प्रेम हजार लाइक्स इन्स्टावर, लग्न ट्विटरचे ट्रोल
प्रेमात माझं सर्वस्व तुझं, लग्न कळला आटे दालचा भाव
प्रेमात स्वर कोकिळेचे, लग्नानंतर नुसती काव काव
प्रेम निवडणुकीतलं आश्वासन, लग्न सरकारी प्रशासन
प्रेमात गोड संभाषण, लग्न पुरे कर तुझे भाषण!
प्रेम एलिस इन द वंडरलॅण्ड, लग्न रिऍलिटी शो
प्रेमात म्याऊ म्याऊ, लग्नात भो भो
प्रेम डोंगर स्वप्नांचा, लग्न खोल खाई
प्रेम तुझ्यासाठी सर्व जग सोडीन, लग्न नानी याद आयी
प्रेम स्वाद पाणीपुरीचा, लग्न कडू लिंबाची गोळी
प्रेम तुझ्या हातचं पाणीही गोड लागतं, लग्न किती जळकी ही पोळी!
प्रेम मऊ मऊ गादी डनलॉपची, लग्न सुतळीची खाट
प्रेमात फार मौज असते, लग्नात लागते वाट
प्रेमात सर्व काही उलगडतं, लग्न अभेद्द चक्रव्यूह
प्रेमात हृदयी वसंत फुलतो, लग्नात जातो जिऊ
प्रेम फर्स्ट क्लास कतार एअरवेजचा, लग्न लोकलचा प्रवास
प्रेम जणू आपण चंद्रावर आहोत, लग्न सर्व खोटं, होत होते नुसते भास
प्रेमात नसते कुठलीही स्पर्धा, लग्न कंपीटीटीव्ह स्पिरिट
प्रेमाचं आकलनच नाही, लग्नात ठरवतात मेरिट
प्रेम शुद्ध बावळटपणा, लग्न करतात शहाणी
प्रेम टीझर, प्रेम ट्रेलर! लग्न घाई करू नका, पुरी पिक्चर अभी है आनी...
-- नेहा बापट अन्वेकर, स्टॅफोर्ड, यु. के.
इतक्या कमी वयात खूपच अनुभवाचे बोल
ReplyDeleteDhanyawaad 🙏
DeleteKhup chan mast aahe swath ch anubhav ka
ReplyDeleteHo Ho 😅
Deleteअनुभव भारी आहे 😀 पोहणे को तो उत्तरे हे अब बस किनारे की तलाश
ReplyDeleteKhup chaan kavita ahe...
ReplyDeleteआता "पूरी पिक्चर" जो आनी है उस की वाट पाहतो आहे.
ReplyDeleteखुन छान कविता.