Saturday, 24 January 2026

३.६ 'ग' ची बाधा (सदर) - गीत: सांज-वारा (कुमार जावडेकर)

सांज वारा – युगुल गीत 

कुमार जावडेकर

(तोः) साथ सांजेस त्या पाहिले रंग ते, लेवुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?
(तीः) सांजवाऱ्याप्रमाणे मला स्पर्शण्या, धावुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

(तीः) ते क्षणांचे सखे! रंग विरतात ना...
(तोः) पण स्मृती होउनी रंग उरतात ना!
तू मनाला तुझ्या एवढे आज समजावुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

(तोः) वागतो नेहमी स्वैर वारा किती!
(तीः) बाळगे ना मनी तो जगाची क्षिती...
अंतरी आपुल्या आज विश्वास तू ठेवुनी सांग येशील का?
सांग ना, सांग येशील का?

- कुमार जावडेकर, स्टॅफोर्ड, यु. के. 

टीप: एकदा मी रेडिओवर एक हिन्दी गाणं ऐकलं. ती चाल डोक्यात घोळत होती. मग त्या चालीत शब्द भरून एक वेगळंच मराठी भावगीत करता येईल का असा विचार करून, केवळ एक प्रयोग म्हणून, मी हे मराठी गीत लिहिलं. बाकी दोन्ही गाण्यांच्या शब्दांत किंवा अर्थात बाकी काही साम्य नाहीये.   

8 comments:

  1. छान आहे गीत. प्रयत्न करतोय एका चालीचा

    ReplyDelete
  2. धन्यवाद! जरूर पाठवा चाल.

    ReplyDelete
    Replies
    1. आत्ताच श्रीकांत कडे पाठविली आहे, अभिप्राय कळवावा 🙏

      Delete
  3. खूप सुंदर. एकदा बैठकीत हे सादर करा.

    ReplyDelete
  4. मी एक चाल लावून पाठविली आहे श्रीकांत कडे. जरूर अभिप्राय कळवावा 🙏

    ReplyDelete
  5. धन्यवाद संजय जी. चाल छान आहे. आपल्याला हे गीत त्यासाठी निवडावंसं वाटलं याबद्दल मी आपला आभारी आहे.

    ReplyDelete
  6. कुमार, छान कल्पना आणि शब्द. आता श्रीकांत गाऊन दाखवतील अशी खात्री आहे!

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर