बॉडी पार्ट्स
सौ. लीना फाटक
Medical
science ची, झालीय खूप प्रगती
नवीन body parts ची, सद्ध्या
आहे चलती ||१||
डोळ्यांतल्या भिंगानी, अक्षर होईल मोठे
ऐकण्याच्या यंत्रानी, कानच होतील छोटे ||२||
तोंडातली gap भरतील, नकली सुरेख दात
चावणं, बोलणं, हसायला, नसेल काही ताप ||३||
गुडघ्याला पण मिळेल, नवीन लोखंडी part
Pacemaker नी निदान, चालेल weak
heart ||४||
केस झालेत का विरळ?, मग घाला की टोप
चेहेर्यांवर तर असतोच नेहमी, भरपूर make-up ||५||
मणक्यांत झालीय का, de-generation
gap?
"Hip" बोलतंय का, click-ti-clack? ||६||
Replacement
करायला, surgeon घेतील धाव
जिवाला तर असतेच, नेहमी जगण्याची हाव ||७||
Plastic
surgery ने, दिसाल तरूण जवान
नवीन Body parts नी मिळेल, चांगलं जगण्याचा
chance ||८||
होईल bionic body, पण
वाटेल का "आपली" ती?
Mind फक्त असेल स्वत:चं, का ते पण होईल
"slip"? ||९||
Mind
च जर झालं slip, तर नाही त्याला नवीन part
लोप होता स्मरणशक्ती, जवळच्यांना मात्र त्याचा त्रास ||१०||
Dementia,
Alzheimer च्या, धास्तीने मन बेजार
करते तरी मनाशी, एक positive विचार ||११||
"माझे" असे नसतेच कांही, शिकवते ना आपले (हिंदु)
तत्वज्ञान
मग कशाला करावी उद्याची काळजी, enjoy आजचा दिवस छान ||१२||
-
सौ लीना फाटक
इंग्लिश - मराठी शब्दांच किती सुंदर कॉम्बिनेशन? आणि जाता जाता शेवटच्या ओळीतून तत्वज्ञानही सांगितलं. सकारात्मक दृष्टी म्हणजे काय हे या कवितेतून शिकाव.
ReplyDeleteThank you Shrikant. Much appreciated. Lina Phatak
ReplyDelete