इथे साकारल्या मूर्ती
श्रीकांत पट्टलवार, संतोष देशपांडे, अश्विनी काणे, कल्पना मुनगपती
अडीच
वर्षाचा
डिंगू
गणपतीसाठी आजी आजोबांकडे आला होता. त्याचा हा दुसराच गणपती होता. आजीकडून
हात पाय धुऊन धावत धावत स्वारी बाप्पांसमोर आली. आजोबांच्या मांडीवर
विराजमान झाली, आणि लगेच प्रश्नांचा भडीमार सुरू केला.
उंदीर मामा कुठे पळाला? फुलांच्या मागे लपला आहे का?
बाप्पाच्या हातात काय आहे ? त्यानी डोक्यावर गोल्डन क्राऊन का घातलाय?
मग विचारलं, आजोबा हा बाप्पा कोणी बनवला?
आजोबा म्हणाले, माझ्या एका फ्रेंडनी, खास आपल्यासाठी.
तुमचा फ्रेंड माझ्यासाठी पण बनवेल का एक गणपती?
फ्रेंड कशाला पाहिजे? तू स्वतःच आपला गणपती बनवू
शकतो.
रिअली? कसा?
मग आजोबा त्याला ग म भ न च फेसबुक पेज दाखवतात. हे पहा,
संतोष काकांनी तुझ्या कितीतरी फ्रेंड्स ला बाप्पा बनवायला शिकवलं.
ओ.... wawoo,
बोलायच का त्यांच्याशी? आजोबांनी लगेच संतोष काकाला फोन लावला.
संतोष काका सांगू लागले..
२०० हून अधिक मुलं इंग्लड आणि भारतातून या वर्कशॉप मधे जाॅईन झाले होते. आणि त्यांचे पालक धरले तर एकाच वेळी ४०० हून अधिक जण यात सहभागी झाले होते.
आजोबा म्हणाले पण एकाच वेळी इतक्या जणांना स्टेप बाय स्टेप इंस्ट्रकशन्स द्यायचे म्हणजे एक आव्हानच म्हणायचं ?
मुळीच नाही. तुम्ही पाहिल का? प्रत्येक जण ज्याला जशी पाहिजे तशी मूर्ती बनवतो आहे. कोणी छोटी तर कोणी मोठी. प्रत्येकाने आपले रंग निवडले आहे. आपली स्वतंत्र स्टाईल निवडली आहे. मूर्ती कशी बनवायची हे मी त्यांच्यावर सोडलं आहे.
काय आहे, प्रत्येकाची मूर्ती कडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने विचार करत असतो. ज्याला गणितात इंटरेस्ट आहे तो गणपती पायापासून डोक्यापर्यंत प्रपोर्शनल आहे की नाही यावर जास्त लक्ष देतो . कोणी हत्तीच एवढ मोठ डोकं मूर्तीवर कसं ठेवायच याचा विचार करतो. कोणी आपल्या आवडीचे रंग निवडतो. कोणी मूर्तीसाठी माती कशी बनवायची याचा विचार करतो. थोडक्यात काय आहे, गणेश मूर्ती वर्कशॉप हे फक्त निमित्त आहे. उद्देश मात्र मुलांच कुतुहल जागृत करण्याच आहे. त्यामुळे या मुलांची गणपतीच काय पण कुठल्याही वस्तूकडे पाहण्याची त्यांची दृष्टी नक्कीच बदलू शकते.
आजोबा म्हणाले - एकदम बरोबर. खूप छान कल्पना आहे संतोष काका तुमची. आपल्याला मनःपूर्वक धन्यवाद. आणि गमभन चळवळीला खूप खूप
शुभेच्छा.
डिंगू सोबत आजोबा फेसबूकवर पुढे पुढे सरकू लागले....
आणि हे पाहिलं का डिंगू, लंडनची अश्विनी मावशी तर गेली अकरा वर्षे गणपतीची मूर्ती घरीच बनवते आहे. अश्विनी मावशी जितकं छान गाणं म्हणते तितकेच सुंदर सुंदर गणपती पण बनवते. तिने बोलावलय आपल्याला. जायचं कां?
आणि ही पहा कल्पना मावशी! ही तर मूर्तीकारच आहे! हिने गणपतीची मूर्ती तर बनवलीच पण रामजन्मभूमी प्रतिषठानच्या मुहुर्तावर एक सुंदर बाल-राम पण आमच्या समोर ऑनलाईन बनवला होता. रामलल्ला घडवताना काय वाटलं होतं तिला ? – ऐक
“जसजसा जानेवारी जवळ येऊ लागला, तसतशी राम प्राणप्रतिष्ठेची अपेक्षा प्रचंड वाढली. आम्ही संपूर्ण यूकेमधील विविध समुदायांना अक्षता वाटप करण्यात, आकाशत कलश अर्पण करण्यात व्यस्त होतो. सलग अकरा दिवस भजने गायल्यामुळे वातावरण भक्तीमय झाले होते आणि आमची अंतःकरणे भक्तीने गुंजली होती.
भावनेच्या या उत्तुंग अवस्थेत, रामलल्लाच्या मूर्तीच्या दर्शनाने आमचे अंतःकरण आनंदाने आणि हेतूने भरून गेले. या पवित्र प्रसंगी काहीतरी खास करण्याची प्रेरणा मिळाली. सर्जनशीलतेच्या आणि निकडीच्या क्षणी मी प्राणप्रतिष्ठेच्या अगदी शेवटच्या क्षणी राम लल्लाची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला. आणि अयोध्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशीच आम्ही आमच्या देवघरात रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना पण केली. ”
मग काय विचार आहे डिंगू?
पुढच्या वर्षी मी पण माझा गणपती बनवणार!!
गणपती समोरचा एक मोदक गट्टम करून डिंगूची स्वारी “गणपती बाप्पा मोय्या - पुढच्या वर्षी लवकर या!” अश्या आरोळ्या देत पुढच्या मोहिमेवर निघाली .
मुलांकडून इतकं कठीण काम करून घेतल्याबद्दल देशपांडे यांचे अभिनंदन आणि पुढील वर्षासाठी डिंगूला शुभेच्छा.
ReplyDelete