Friday, 18 October 2024

३.५ कविता - व्यथा (अंजली शेगुणशी)

व्यथा 

अंजली शेगुणशी

तू आहेस सागर तृष्णेचा...

अथांग शांततेत वादळे दडवणारा
प्रत्येक लाटेसवे रंग बदलणारा
किनाऱ्याला विसरून
आकाशीच्या चन्द्रावर प्रीत जडवणारा

कधी समजेल का तुला दु:ख किनाऱ्याचे?

नखशिखांत कधी भिजवून भरतीत प्रेमाच्या
क्षणात ओहोटीने, तूच बनवतोस वाळवंट त्याला

किनाऱ्याची हीच व्यथा की दैवाने तो बांधला तुला 
किनाऱ्याची हीच व्यथा की तोही नसतो तू नसताना

- अंजली शेगुणशी


No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर