Labels

Friday, 18 October 2024

७. पश्चिमाई (कुमार जावडेकर)

पश्चिमाई 

कुमार जावडेकर 


पूर्वरंगांची जुन्या प्रतिमा नवी ही पश्चिमाई
शब्दवेलींना नवेली पालवी ही पश्चिमाई

विस्मृतींचे दाटती काहूर जेव्हा अंतरी या
भोवताली फेर धरते लाघवी ही पश्चिमाई

चोरुनी बघता हिला मी चोरते नजरा कधी ही
खेळते नेत्रांतुनी का पल्लवी ही पश्चिमाई

बोलते, हसते तशी, रुसते कधी फुगते कधी ही
सांग ना होते कशाला मानवी ही पश्चिमाई

कोण तू अन् कोण मी हा शोध आता संपला अन्
भासते अवघी मनाला भैरवी ही पश्चिमाई

- कुमार जावडेकर 

2 comments:

  1. अप्रतिम. ह्यावर चर्चा करायला हवी

    ReplyDelete

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर