विसर्जन
डॉ. मुकुल आचार्य
- बाप्पांच्या विसर्जना करता आलेल्यांनी घाट भरला होता सगळा
- बाप्पा सोडून वेगळं काही विसर्जन करण्यासाठी आलेला मी वेगळा
- उरला सुरला अभिमान विसर्जून आज वाढवून प्रस्थ मी आलो
- वाहणाऱ्या शांत सरितेला आज अस्वस्थ करून मी आलो
- आप्त स्वकीयांकडून तडा गेलेल्या विश्वासाला दान करून आलो
- त्या बेफिकिर खळाळत्या पाण्याला वास्तवाचं भान देऊन आलो
- भावपूर्ण पण तुडवलेल्या इच्छांना आज सरितेस अर्पून आलो
- त्या सात्विक शुद्ध पाण्याला आज मी भारावून आलो
- पुस्तकातील सुकलेली फुले आज धुंदीत विसर्जून आलो
- त्या निश्चल, निर्गुण सरितेला सुगंधित करून मी आलो
- संवेदनाशील पण उध्वस्त मन आज सरितेत बुडवून आलो
- खळखळून हसणाऱ्या त्या पाण्याला रडवून आलो
- हळुवार, गोड अपुरी स्वप्ने आज सरितेत सारून आलो
- सरळ विवेकशील अशा प्रवाहाला आत बावरून आलो
- विरहाच्या दुःखाची आसवे सरितेत जिरवून आलो
- उथळ नदीच्या पात्राला आज तुडुंब भरून आलो
- तिने लिहिलेली प्रेम पत्रे आज सरितेत वाहून आलो
- दुथडी भरून वाहणाऱ्या पाण्यात आग लावून आलो
- लोभ प्रेम जिव्हाळा साऱ्यांचे विसर्जन करून आलो
- गढूळ होऊ लागलेल्या पाण्याला शुद्ध करून आलो
गणेशोत्सवातील आदर सत्कार, भक्तांचे हजारो प्रश्न, विनंत्या तक्रारी, सर्वांची यादी सोबत घेऊन बाप्पा आनंदाने मूषकावर अरुढ होऊन परतीच्या प्रवासाला निघाले होते. दहा दिवसात दोघांचेही कान बधीर झाले होते. विसर्जन सोहळ्यातील ढोल ताशामुळे होणारा उरला पुरला त्रास कमी करण्याकरता बाप्पांनी आपले दोन हात स्वतःच्या कानावर आणि दुसरे दोन हात मुशकाच्या कानावर ठेवले होते. तेवढ्यात मूषकाच्या फोनवर 'डिंग' असा आवाज आला.
ReplyDeleteमूषक म्हणाला, "बाप्पा थोडा वेळ थांबायच का?डाॅ. आचार्यांनी एक कविता पाठवली आहे ती वाचू आणि मग पुढे जाऊ."
बाप्पा म्हणाले "बस झालं आता. कैलासावर गेल्यावर वाचू. चल नीघ पुढे."
मूषक म्हणाला, " सतत बीझी राहणाऱ्या आचार्यांनी त्यांची कविता आत्ता पाठवली म्हणजे ती नक्कीच महत्त्वाची असणार. हे घ्या. मी ती लगेच वाचूनच दाखवतो."
मूषक पटापट कविता वाचतो...
कविता ऐकल्यावर बाप्पा म्हणाले, "तू हो पुढे. मी आलोच."
"काय झालं काय झालं बाप्पा?"
बाप्पा म्हणाले,
ऐकून विचार आचार्यांचे प्रसन्न मी झालो.
पुन्हा एकदा कविता त्याची वाचून मी आलो.
🙏🌹
This comment has been removed by the author.
ReplyDeleteछानच
ReplyDeleteवा कविवर्य! अभिनंदन. छुपे रूस्तुम निकले! काका करमरकर
ReplyDeleteछान आहे
ReplyDelete