Friday, 18 October 2024

६ चणे-फुटाणे - मोफत ज्ञान (श्रीकांत पट्टलवार)

मोफत ज्ञान 

श्रीकांत पट्टलवार 

What's app चा शोध गेल्या १०-१५ वर्षातला आहे असा एक सर्वसाधारण गैरसमज आहे. पण या पृथ्वीतलावर व्हाट्स-अप येणार हे संत तुलसीदास यांना बर्‍याच वर्षांपूर्वीच जाणवले होते. 

व्हाट्स-अप आल्यावर सर्व ज्ञान  हवेच्या वाटेने सर्वदूर पसरेल आणि ते पाण्यासारखे इतके सहजपणे उपलब्ध होईल की बहुतांश लोक ते न वाचताच इतरांना वाटून विनाकष्ट पुण्यही मिळवतील. 

खालील रचनेवरून संत तुलसीदासांना व्हाट्सअप येणार याची कल्पना होती हे सिध्द होतं. 

What: वात (= वायू)

App: आप (= पाणी)

वात आप पर कथा सुनाई ।
पढे बिना उस आगे बढाई ॥
ज्ञान बांटकर पुण्य ही पाई।
तुलसी ऊपर माथा कुटाई ॥

श्रीकांत पट्टलवार


2 comments:

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर