Friday, 10 July 2026

३.१ 'ग' ची बाधा (सदर) - भ्रमंती (गझल) (कुमार जावडेकर)

भ्रमंती

क्षणात येथे, क्षणात तेथे फिरून येशी
मना भ्रमंती कुठे कुठे तू करून येशी?

छतातुनी या सदा बरसती तुझेच अश्रू
उरी प्रलय तू कशास इतका भरून येशी?

'सुरू करूया पुन: नव्याने' म्हणून का तू
जुने बहाणे पुनः नव्याने स्मरून येशी! 

घडून येतो जरा दुरावा जसा मनाला
कलीप्रमाणे मनात माझ्या शिरून येशी...

सभोवताली इथे नशीली प्रलोभने अन् 
'कुमार'-वय तू उगा मनी का धरून येशी?

- कुमार जावडेकर, स्टॅफोर्ड, यु. के.  

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर