चित्र:
स्काऊट मधून छोट्या मोठ्या ट्रेक्सचा अनुभव घेतल्यावर आम्ही दहा मित्रमैत्रिणी एखादे मोठे शिखर सर करण्यासाठी उत्सुक होतो.
स्नॉडन, वेल्समधील सर्वात उंच पर्वत, मला नेहमीच आकर्षित करत असे. त्याच्या चढाईबद्दल आम्ही अनेक भीतीदायक अनुभव ऐकले होते—पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून एक आव्हान म्हणून स्नॉडनवर चढाई करण्याचा आम्ही निर्धार केला आणि त्यासाठी ईस्टरच्या सुट्टीतील, शनिवार निश्चित केला .
शनिवारी सकाळी आम्ही आईने न उठवता आपणहून उठलो, पहाटेच्या गुलाबी थंडीने आमचा उत्साह द्विगुणीत झाला होता, सूर्याच्या कोवळ्या किरणांमुळे निसर्गाचे सौंदर्य अजूनच खुलून आले होते. वर चढत असताना आम्ही एका सुंदर दगडी पुलाखालून गेलो, त्या पुलात काहीतरी वेगळेपण होतं ज्यामुळे मी त्याकडे आकर्षित झाले आणि कित्तीतरी वेळ मंत्रमुग्ध होऊन त्याकडे पाहतच राहिले. अचानक टुकटुक आवाज करत आणि धुराचे लोट सोडत पुलावरून जाणारी छोटीशी आगगाडी या निर्जीव पुलात जीव ओतून गेली .
त्या पुलाच्या आजूबाजूला पसरलेले, उंच-उंच वाढलेलं रानगवत, आणि त्या पुलाखालून जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा पसरलेल्या मोठ्या दगडांनी त्या पुलाच्या सौंदर्यात अजूनच भर पडत होती आणि हे विहंगम दृश्य कागदावर चितारल्याशिवाय मला रहावले नाही.
- स्वरा पवार

स्वरा तुझा स्नॉडनचा अनुभव तु मनापासुन वर्णन केला आहेस, हे तु काढलेल्या चित्रातून दिसते. 😊
ReplyDeleteस्वरा, तुझं लिखाण खूप गोड आणि जिवंत वाटतं. पुलावरून जाणाऱ्या छोट्या आगगाडीचं वर्णन इतकं खरं वाटतं की जणू आपणच तिथे उभे आहोत. शेवटी ते दृश्य कागदावर उतरवावंसं वाटणं हा तुझ्या कलात्मक नजरेचा सुंदर touch आहे. Well done, अशीच लिहीत राहा!
ReplyDeleteस्वरा, लेख छानचं लिहीलास. सोबतीला सुरेख चित्र घालून लेखात आणखी जिवंतपणा आणलास. तुमची स्नाॅडनची चढाई नक्कीच यशस्वी झाली असणार...अशीच लिहीत राहा. मनःपूर्वक शुभेच्छा.
ReplyDelete