कैलास-मानसरोवर तीर्थयात्रा
शब्दांकन - श्रीकांत पट्टलवार
(यात्रेकरू: बिपाशा शर्मा, शुभ्रा शिवांगी, अंजनी आणि आनंद शिंत्रे)
ॐ नमःशिवाय.
श्री शंकराचे कायम वास्तव्य असलेला कैलास पर्वत आणि ब्रह्माने आपल्या मनाने निर्माण केलेले मानसरोवर परिक्रमा म्हणजे परमेश्वरावर श्रद्धा असणाऱ्यांसाठी आयुष्यातील उच्चतम यात्रा. ही यात्रा म्हणजे पर्यटन नसून एक आध्यात्मिक तीर्थयात्राच आहे. तिथे जाण्यासाठी लागणारी तयारी म्हणजे तपश्चर्याच. ही तीर्थयात्रा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या काही पुण्यवंत मित्रांचे रोमांचकारी आणि दिव्य अनुभव वाचकांपर्यंत पोहोचावे या हेतूने या शब्दरूपी यात्रेचा एक प्रयत्न.
कैलास
मानसरोवर यात्रेचा मार्ग
हजारो फूट उंचीवरील तिबेटच्या पठारावर असणारे प्राणवायूचे विरळ वातावरण, त्यामुळे श्वासोच्छवासावर होणारा परिणाम, अनपेक्षित पणे होणारा हिमवर्षाव यामुळे ही यात्रा अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक असते.
त्यामुळे
प्रत्यक्ष कैलास परिक्रमा तीन दिवसाची असली तरी विरळ वातावरणाशी जुळवून घेण्याकरता ती करतात. त्यामुळे एकंदर प्रवास १५-१६ दिवसांचा होतो. काठमांडूत पशुपती नाथाचे दर्शन घेऊन ल्हासा - सागा, मानसरोवर; प्रत्येक ठिकाणी २-२ दिवस मुक्काम करत श्री कैलासच्या दिशेनी मार्गक्रमण करतात. मानसरोवराला एक प्रदक्षिणा घालून श्रीकैलासच्या पायथ्याशी ४०५७५ मीटर उंचीवरील दारचेनला २-३ दिवस विश्रांती घेतात. पुढे दिरापुख इथून श्री कैलास शिखरास चरणस्पर्श करून ३६ किलोमीटरची पद-परिक्रमा सुरू होते.
ब्रह्माने या परिसराची रचना एका
कमलपुपुष्पाप्रमाणे केलेली आहे. दोन वर्तुळांत पाकळ्यांप्रमाणे विखुरलेले
उंच उंच हमाच्छादीत पर्वत. आणि मधोमध
कैलास शिखर. या रचनेमुळे मुळे श्री कैलासला
बाह्य आणि अंतर अशा दोन प्रकारे परिक्रमा करता येतात. बारा बाह्य परिक्रमा
केल्यानंतरच आंतर परिक्रमेची परवानगी मिळते कारण
ती खूप खडतर आहे.
यात्रेतील
प्रत्येक मुक्कामात रोज सकाळी शारीरिक स्वास्थ्यासाठी योगासन, प्राणवायूशी लढा देण्यासाठी प्राणायाम, मनशांतीसाठी ध्यानधारणा, हवनपूजन असे विधी
एकत्रितपणे करतात. भगवान शंकराची सामूहिक आराधनात म्हणा. भगवान शंकर तसा भोळा. भाविकांची अशी आराधना
पाहून तो प्रसन्न न झाला तर नवलच. मग काय, पुढील
प्ररिक्रमा तो स्वतःच सूकर करतो.
आनंद आणि अंजनीला झालेले भालचंद्र दर्शन
मानसरोवराला
(बसमधून) एक प्रदक्षिणा करून शुभ्रा आणि बिपाशा दोघी बसमधून उतरल्या. स्फटिकाप्रमाणे तळ दिसेल इतकं स्वच्छ पाणी, वर शुभ्र निळे आकाश आणि आणि समोर साक्षात श्री कैलास! इतकं रोमांचकारी दृश्य पाहून दोघीजणी स्वतः ला पूर्णपणे विसरून गेल्या.
देव भूमी, स्वर्गीय शांतता म्हणजे काय याची दोघींना प्रत्यक्ष प्रचीति
आली. वर्षभर ज्या यात्रेसाठी तन-मन धन लावून तपश्चर्या केली होती त्याच
सार्थक झालं होतं. समर्पित भावनेनं इथे येणारा प्रत्येक यात्रेकरू असेच भव्य दिव्य
अनुभव घेऊन परततो.
यमद्वार- परिक्रमेची सुरवात
तिबेटमधील बौध्द संस्कृतीचे एक वैशिष्टय़पूर्ण बांधकाम म्हणजे यमद्वार. बाह्य परिक्रमा मार्गावर इथून प्रवेश घेऊन दिरापोक आणि 'डोलमालापास अशा ३६ किलोमीटरच्या तीन दिवसाच्या कठीण
पदयात्रेला सुरुवात करतात. जे यात्रेकरू
काही कारणाने पुढील प्रवास करू शकत नाही त्यांनी इथून परतण्यापूर्वी
यमद्वारची प्रदक्षिणा तरी नक्कीच पूर्ण करावी. यमद्वार हा शब्द ऐकूनच खरं म्हणजे
मनात धडकीच भरते. पण इथे यमद्वाराला
प्रदक्षिणा केली की आयुष्यातली सर्व भीती नष्ट होते. भयमुक्त आयुष्य म्हणजे आनंदच.
आणि पुढे परिक्रमा पूर्ण झाली तर परमानंद. कैलास मानसरोवर परिक्रमा यशस्वीपणे
पूर्ण करून परतलेल्या आमच्या या मित्र-मैत्रिणींच्या चेहऱ्यावरील चेहऱ्यावरून सतत
ओसंडणारा आनंद पाहून या वचनाची सत्यता पटते.
परिक्रमेच्या
दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्याच्या किराणांनी चकाकणाऱ्या कैलासशिखराचे
सौंदर्य न्याहाळणे म्हणजे या तीर्थयात्रेतला सुवर्ण क्षण. सुवर्ण शिखर पाहून अजूनही इथे श्री गौरी
शंकराचे वास्तव्य आहे याची खात्री पटते. संपूर्ण प्रवासात अशा प्रकारचे रोमांचकारी
अनुभव सतत येत राहतात. परतताना गौरीकुंड, तसेच सुरुवातीच्या टप्प्यात विंचवाच्या आकाराचे यमुद्रोक सरोवर,
मानसरोवराजवळील राक्षसताल, सप्तपद, अशा अनेक पवित्र ठिकाणांचे दर्शनही होतं
तिबेटियन
लोकांचा नम्र स्वभाव, सेवाभावी
वृत्ती यांनी मन भरून येतं. ब्रह्माने
निर्माण केलेल्या विशाल आणि पवित्र संकल्प भूमीचे दर्शन घेऊन परतल्यावर माणूस
पूर्णपणे बदललेला असतो. या सृष्टीत आपण म्हणजे एक नाम मात्र बिंदू आहोत याची जाणीव
होते. योगासन प्राणायाम याचे महत्त्व पूर्णपणे पटते. यात्रेमुळे ते अंगवळणी
पडल्यामुळे पुढील आयुष्य निरोगी आणि आनंदी होते. विपाशा, शुभ्रा, आनंद
आणि अंजनी यांनीपवित्र कैलास मानसरोवराची ही मानस
यात्रा घडवल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.
ॐ नमःशिवाय!
शब्दांकन - श्रीकांत पट्टलवार
No comments:
Post a Comment
प्रतिसाद