Friday, 10 July 2026

३.४ प्रवास माणसाचा (नेहा बापट)

प्रवास माणसाचा 

- नेहा बापट


प्रवास करत माणूस कुठवर पोचला, जगणं झालं सोपं
अता इन्स्टा वर लाईक्स येत नाहीत, म्हणून लागत नाही झोप

नळ उघडल्यास पाणी येतं, एका बटनावर पेटते चूल
तरीही म्हणतो, नको रे बाबा, सध्या झेपणार नाही मूल
अन्न, वस्त्र, छत्र मिळवणे, हे प्रश्नच आऊट ऑफ स्कोप
इन्स्टा वर लाईक्स येत नाहीत, म्हणून लागत नाही झोप (१)

वन-क्लिक वर हाऊस-हेल्प, आपण किती भाग्यवान
आपली पोळी स्वत: कमवतो, जपतो स्वाभिमान
या स्वाभिमानाचा अभिमान झाला, की होतो विकोप
इन्स्टा वर लाईक्स येत नाहीत, म्हणून लागत नाही झोप (२)

लग्नाची वर्षगाठ साजरी केली, फिरताना आइसलँड
नंतर लंच आमचा पॅरिसला आणि डिनर स्वित्झर्लंड
अता फोटो पोस्ट करते, घेऊन तुमचा निरोप
इन्स्टा वर लाईक्स येत नाहीत, म्हणून लागत नाही झोप (३)

ज्ञान, विज्ञान, संशोधन, स्टार्टअप, सांगा तुम्ही काय करणार
पूर्वीच्या काळी सोनाराचं मूल सोनार आणि लोहाराचं लोहार
असंख्य संधी, प्रयत्न कमी, करतो नुसते आरोप
इन्स्टा वर लाईक्स येत नाहीत, म्हणून लागत नाही झोप (४)

जुन्या प्रवासींनी वाट शोधली, घेऊन कष्ट फार
आपला प्रवास सुखकर केला, मानूया त्यांचे आभार
पण सध्याच्या परिस्थितीत दिसत नाही फार होप
इन्स्टा वर लाईक्स येत नाहीत, म्हणून लागत नाही झोप (५) 

स्ट्रेस, डिप्रेशन, एंग्जायटी का? या प्रवासाचे भोग?
चला टाळूया हे सर्व, निवडूया ध्यान आणि योग
'योगा से ही होगा', अता यावरच सर्व होप
इन्स्टा वर लाईक्स येत नाहीत, म्हणून लागत नाही झोप (६) 

- नेहा बापट, स्टॅफोर्ड, यु. के. 

No comments:

Post a Comment

प्रतिसाद

संयोजक

श्रीकांत पट्टलवार, मीरा पट्टलवार, रवी दाते, मुकुल आचार्य, कुमार जावडेकर